Take a fresh look at your lifestyle.

सोलर रुफटॉप योजना : 2022 :- आता तुमच्या घराच्या छतावर बसवा सोलर रुफटॉप पॅनल !

0

  शेतीशिवार टीम, 12 जून 2022 :- Solar Rooftop Yojana : सौर रूफटॉप योजना भारत सरकारच्या अक्षय ऊर्जा मंत्रालयाने सुरू केली आहे. ही रूफटॉप सोलर योजनेतून 2022 पर्यंत 40,000 मेगावॅटची एकत्रित सौर उर्जा क्षमता साध्य करण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.    

यामध्ये ग्रिड-कनेक्टेड छप्पर किंवा लहान सोलर फोटोव्होल्टेइक (SPV) प्रणाली समाविष्ट आहे, ज्यामध्ये SPV पॅनलमधून निर्माण होणारा DC विद्युत प्रवाह पॉवर कंडिशनिंग युनिट वापरून AC करंटमध्ये रूपांतरित केला जातो आणि ग्रिडमध्ये चालविला जातो. या योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा असं आवाहन अक्षय ऊर्जा मंत्रालयाने केलं आहे.

या योजनेमुळे सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात मोठी बचत होईलच शिवाय वापरानंतर वीज शिल्लक राहत असल्यास महावितरण ती वीज विकत घेणार असून आपोआप त्याचे पैसे वीजदेयकातून वळते केले जाणार आहे.

खरंतर ही योजना केंद्र सरकारने वर्षभरापूर्वी सुरु केली होती परंतु कोरोनामुळे तसेच लोकांची कमी उत्सुकता दिसत असल्याने ही योजना पुन्हा एकदा नव्याने सुरु केली आहे.

आता राज्य सरकारने ही महावितरण विभागाने याची चांगली अंबलबजावणी व्हावी म्हणून परिमंडळनिहाय संस्थांची नेमणूक केली आहे. त्यांच्या नावांची यादी व ऑनलाईन अर्जाची सोय महावितरणच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

राज्यातील घरगुती वीजग्राहकांना योजनेचा लाभ देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी तातडीने कार्यवाही करावी, असा आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिला आहे.

या योजनेद्वारे देशातील कोणत्याही नागरिकाला त्यांच्या छतावर सोलर पॅनल मोफत बसवता येणार असून या योजनेअंतर्गत सोलर पॅनलमधून मोफत वीज इत्यादींचा लाभ घेता येणार आहे.

सोलर रूफटॉप योजनेअंतर्गत, तुमच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदान दिलं जातं. तुम्ही मोफत सौर रूफटॉप योजनेसाठी अर्ज कसा करू शकता का? आणि येथे दिलेली संपूर्ण माहिती वाचून तुम्हाला या योजनेत कोणते फायदे मिळतील हे सगळं काही जाणून घेऊयात.

काय आहे, ही सोलर रुफटॉप योजना :- 

घरे, कार्यालये, कारखाने इत्यादींच्या छतावर सौर पॅनेल बसवण्याची सुविधा सरकार देत आहे. सोलर रूफटॉप योजना (Solar Rooftop Yojana) असे या योजनेचं नाव आहे. या योजनेंतर्गत कोणत्याही नागरिकाला त्याच्या छतावर सौर पॅनेल मोफत बसवता येतील.

1 किलोवॅट सौर पॅनेल बसवण्यासाठी 10 चौरस मीटर जागा आवश्यक आहे. या सोलर रुफटॉप योजनेअंतर्गत 25 वर्षांपर्यंत सोलर पॅनेलचा लाभ घेता येतो. त्याची संपूर्ण किंमत 5-6 वर्षांमध्ये भरली जाते आणि त्यानंतर 19-20 वर्षांसाठी ते मोफत मिळू शकते.

खर्च आणि बचतीचे अर्थकारण

पाच वर्षांच्या देखभाल खर्चासह छतावरील सौर ऊर्जानिर्मितीची यंत्रणा बसवण्यासाठी एक किलोवॉट क्षमतेसाठी 46,820 रुपये खर्च येईल. एक ते दोन किलोवॉटसाठी 42470 रुपये प्रति किलोवॉट, दोन ते तीन किलोवॉट 41,380 रुपये प्रति किलोवॉट आणि तीन ते 10 किलोवॉट 40,290 रुपये प्रति किलोवॉट तसेच 10 ते 100 किलोवॅटसाठी 37,020 रुपये प्रति किलोवॉट असा खर्च येईल.

म्हणजेच तीन किलोवॉट क्षमतेची यंत्रणा बसवण्यासाठी 1,24,140 रुपये खर्च येईल. त्यामध्ये 40 टक्के अनुदानाप्रमाणे 49,656 रुपयांचे केंद्र सरकारचे अनुदान मिळेल व ग्राहकाला प्रत्यक्षात 74,484 रुपयांचा खर्च करावा लागेल. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर दरमहा 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांची मासिक सुमारे 550 रुपयांची बचत होईल.

सोलर रुफटॉप शी संबंधित ही माहिती जाणून घ्या…

येथे आम्ही तुम्हाला सोलर रूफटॉप योजनेशी (Solar Rooftop Yojana) संबंधित काही खास माहिती देणार आहोत. ही माहिती खालीलप्रमाणे आहे

एक किलोवॅट सौरऊर्जेसाठी 10 चौरस मीटर जागा लागते.

तुमचे घर कार्यालयाच्या किंवा कारखान्याच्या छतावर सौर पॅनेल लावा आणि विजेचा खर्च 30 ते 50 टक्क्यांनी कमी करा.

केंद्र सरकार 3 किलोवॅटपर्यंतच्या सौरऊर्जेवर 40% आणि 10 किलोवॅटपर्यंतच्या 3 किलोवॅट वर 20% अनुदान देतं.

सोलर रुफटॉप योजनेतून तुम्हाला कोणते फायदे मिळतील… 

वीज बिलात सवलत.
पर्यावरणपूरक वीज निर्मिती
मोफत वीज
सुमारे 25 वर्षे सौर पॅनेल वापरण्याचे फायदे
येणारा खर्च 5 किंवा 6 वर्षांत भरावा लागेल.

तुमच्या छतावर सोलर पॅनेल मोफत कसा मिळवाल ?

सोलर रूफटॉप योजनेसाठी उमेदवार त्यांच्या छतावर सोलर पॅनेल मोफत बसवण्यासाठी अधिकृत वेबसाइट solarrooftop.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या प्रक्रियेद्वारे जाणून घ्या –

solarrooftop.gov.in वर या अधिकृत व्हेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ‘Solar Rooftop Calculator’ हे कॅल्क्युलेटर देण्यात आलं आहे. यामध्ये तुम्हाला ‘Solar Panel Capacity you want to install’ यावर क्लिक करून तुमच्या किती किलोवॅट सोलर पॅनल लागणार आहे तसेच ‘Your budget’ इत्यादी माहिती भरून तुम्ही कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता…

या नंतर तुम्ही होम पेजवर Apply For Rooftop Solar पर्यायावर क्लिक करा.
पुढील पृष्ठावर आपल्या राज्याच्या वेबसाइटच्या css.mahadiscom.in लिंकवर क्लिक करा.
अर्ज तुमच्या समोर उघडेल.
फॉर्ममध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
त्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
सौर रूफटॉप योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

टीप : तुम्ही हा फॉर्म जनसेवा केंद्रावरही भरू शकता.

सोलर रूफटॉप योजनेचा (Solar Rooftop Yojana) हेल्पलाइन क्रमांक :-

सोलर रूफटॉप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी किंवा या योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही या हेल्पलाइन क्रमांक 1800 180 3333 वर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संपर्क माहिती देखील मिळवू शकता आणि तुमची समस्या सहजपणे सोडवू शकतात.

अर्ज भरण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या जनसेवा केंद्र (सेतू) केंद्राला भेट द्या.

माऊली डिजिटल सेवा सेतू केंद्र :- 
तलाठी कार्यालयाजवळ, दुर्गा देवी चौक, नेवासा, मो. 9970434665

Leave A Reply

Your email address will not be published.