शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेला गती, गाई गोठ्यासाठी 77,188 रु. तर पोल्ट्री शेडसाठी मिळतंय 49,760 रु. अनुदान, हा PDF फॉर्म लगेच भरा..

0

भारताच्या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना : 2023 सुरू केली असून या योजनेला आता गती मिळाली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गाई – म्हशी, कुक्कुट पालनासाठी गोठा शेड बांधण्यात येणार आहेत.

या लेखात आपण महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2023 शी संबंधित संपूर्ण माहिती जणू घेणार आहोत. जर तुम्हाला या योजनेत अर्ज करायचा असेल तर तर हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागणार आहे.

शरद पवार योजनेसाठी अर्ज कोठे आणि कसा करायचा ? उद्दिष्ट काय आहे?, अनुदान किती मिळणार ? हे या लेखात पाहणार आहोत.

सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेतून गुराचा गोठा बांधण्याचे काम सुरु असून, हे सर्व प्रक्रिया राबविण्याचे काम तांत्रिक अधिकाऱ्यांमार्फत पूर्ण केले जात आहे.

या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या 4 कामांसाठी अनुदान दिलं जात आहे.

गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे
शेळीपालनासाठी शेड बांधणे
कुक्कुटपालनासाठी शेड बांधणे
भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग

आवश्यक कागदपत्रे :-

आधार कार्ड
मतदार कार्ड
मोबाईल नंबर
उत्पन्न प्रमाणपत्र
शिधापत्रिका
पत्त्याचा पुरावा
पासपोर्ट आकाराचा फोटो
प्रवर्ग
नमुना नं 8 किंवा 7/12 उतारा
अदाजपत्रक
अ.ज. / अ.जा. / BPL / भूमिहीन अल्पभूधारक शेतकरी / अपंग
जनावरांचा गोठा शेळ्यांचा तपशील (संख्या)
यापूर्वी जनावरांचा गोठा या कामाचे लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र
प्रस्तावित जागेचा GPS PHOTO (NOTE CAM)
जॉब कार्ड / बँक पासबुक / आधार कार्ड ग्रामपंचायत चे मागणी पत्र

किती मिळणार अनुदान ?

गुरांचा गोठा :-

गुरांच्या गोठ्यासाठी 2 ते 6 गुरे आवश्यक असणार आहे.
जमीन :- 26.95 चौरस मीटर असावी, लांबी 7.7 मीटर तर रुंदी 3.5 मीटर असावी, गव्हाण 7.7 मीटर – 0.2 मी ×0.65 मी.
250 लिटर क्षमतेचे मूत्रसंचय टाकी असून पिण्याच्या पाण्यासाठी 200 लिटर क्षमतेची टाकी असावी.

अनुदान – 77,188 रुपये इतके अनुदान मिळेल. तर 12 गुरांसाठी दुप्पट, 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.

शेळीपालन शेड :-

शेळीपालन शेडसाठी 10 शेळ्या आवश्यक आहे.
जमीन :- 7.50 चौरस मीटर जागा, लांबी 3.75 मीटर आणि रुंदी 2.0 मीटर असावी
4 मी.भिंतीची सरासरी उंची 2.20 मीटर असावी.

अनुदान – शेळीपालन शेडसाठी 49,284 रुपये अनुदान दिलं जाणार असून 20 शेळ्यांसाठी दुप्पट, तर 30 शेळ्यांसाठी तिप्पट अनुदानाचा लाभ घेता येईल.

कुक्कुट पालन शेड :-

कुक्कुट पालन शेडसाठी 100 पक्षी आवश्यक आहे.
जमीन :- 7.50 चौरस मीटर निवारा पुरेसा असून त्याची लांबी 3.75 मीटर असावी तसेच रुंदी 2.0 मीटर असावी.

अनुदान – 100 पक्ष्यांकरिता शेड बांधण्यासाठी 49,760 रुपये अनुदान मिळणार तर 150 पेक्षा जास्त पक्षी असल्यास दुपट निधी मिळणार आहे.

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा अर्ज (अंदाजपत्रक) फॉर्म :- येथे क्लिक करा

फॉर्म भरण्यासाठी स्टेप बाय स्टेप पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा   

Leave A Reply

Your email address will not be published.