आपल्या जीवनातील आपल्या स्वयंपाक घरातील अविभाज्य घटक म्हणजे खाद्यतेल. परंतु देशात रोज लागणारं खाद्यतेल आणि उत्पादन यात खूप मोठी तफावत आहे. तेलबिया उत्पादनात भारत देशाने अद्यापही आत्मनिर्भरता प्राप्त केलेली नाही. देशातील 130 कोटींहून अधिक लोकसंख्येसाठी दरवर्षी खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणावर गरज भासते.
देशातील जनतेची खाद्यतेलाची गरज भागवण्यासाठी भारत सरकारला दरवर्षी परदेशातून खाद्यतेल मोठ्या प्रमाणावर आयात करावे लागते. ज्यामध्ये मोठा भाग पाम तेलाचा बनलेला असतो. पामतेल आयात करण्यासाठी देशाला दरवर्षी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च करावे लागते. त्यामुळे तेलाचे दर भारतात सध्या दुप्पट झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईला सामोरं जावं लागतं आहे.
त्यामुळे देशातील तेलबिया पिकांचे प्रति हेक्टर क्षेत्र आणि उत्पादन व उत्पादकता वाढवून परकीय चलनाची बचत करण्याबरोबरच स्वावलंबीता साधता या साठी केंद्र व राज्ये सरकारने मिळून नवनवीन योजना, उपाययोजना बनवल्या यामध्ये महत्वाची अशी उपाययोजना म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान.
या अभियानाअंतर्गत देशात गळीत धान्य कार्यक्रम राबवला जातो. ज्यामध्ये भुईमूग, सोयाबीन, मोहरी, तोरिया, सूर्यफूल, तीळ, करडई, जवस, नायगर बिया इ. तेलवर्गीय बियांचे उत्पादन व शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी बियाणे वितरण, ठिबक, तुषार सिंचन, पंप संच, पाईपलाईन, शेततळे, विविध कृषी अवजारे यावर 50% पर्यंत अनुदान दिलं जातं. यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे डाळ मिल, तेल घाण्यासाठी ही या योजनेमार्फत अनुदान दिल जातं.
मित्रांनो, आज आपण कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत महा DBT पोर्टलवरून शेतकऱ्यांना तेल घाण्या साठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा ? यासाठी किती अनुदान दिलं जातं ? कागदपत्रे ? लाभ, ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा…
तेल घाण्यासाठी किती मिळेल अनुदान…
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत महा DBT पोर्टलवरून, 3 प्रकारच्या तेल घाण्यासाठी 50% ते 75% पर्यंत अनुदान दिलं जातं. यामध्ये यंत्राची जेवढी किंमत असेल त्याच्या 50% ते 75% अनुदान मिळतं. तसेच हे 50% ते 75% हे अनुदान शेतकऱ्यांच्या वर्गवारीनुसार केलं जातं. त्यामध्ये Open category साठी 50% व SC / OBC / VJ / NT / SBC / ST साठी 75% हे अनुदान मिळतं…
ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा कराल ?
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ‘एक शेतकरी एक योजना’ म्हणजे https://mahadbtmahait.gov.in/ या पोर्टल वर तुम्ही आपला युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा किंवा आपला आधार कार्ड ओटीपी टाकून तुम्ही लॉग इन करू शकता…
लॉगिन केल्यानंतर होम पेजवर तुम्हाला तुमचं प्रोफाइल हे 100% दाखवणं गरजेचं आहे.
यानंतर तुम्हाला अर्ज करा वर क्लिक करायचे आहे. अर्ज करा वर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो आणि एक शेतकरी एक अर्ज अंतर्गत आपल्याला सर्व बाबीचा अर्ज एकाच पोर्टल वरती करता येतो.
याचा आपल्याला ‘कृषी यांत्रिकीकरण’ ही बाब निवडा या बाबी समोर तुम्हाला राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस ही बाब दिसेल त्यामुळे तुम्हाला या अंतर्गतच आपल्याला अर्ज करायचा आहे.
‘कृषी यांत्रिकीकरण’ या ऑप्शनवर क्लिक केल्यांनतर अर्ज तुमच्या समोर उघडेल.
यानंतर तुम्हाला ‘मुख्य घटक’ हा ऑप्शन दिसेल, यामध्ये ”कृषी यांत्रिकीकरण खरेदीसाठी अर्थसाहाय्य” या वर क्लिक करायचं आहे.
या नंतर ‘तपशील निवड’ हा ऑप्शनवर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसेल त्यातील ‘प्रक्रिया संच’ यावर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
या नंतर तुम्हाला ‘मशीनचा प्रकार’ निवडायचा आहे त्यावर क्लिक करून ‘ऑइल मिल फिल्टर प्रेस सह‘ ही बाब निवडा.
या वर क्लिक केल्यानंतर तुम्ही ‘जतन करा’ यावर क्लिक करा…
अर्ज जतन करल्यानंतर तुम्हाला घटक तपशील यशस्वीरीत्या जोडला आहे. अजून घटक जोडायचा आहे का ? तर तुम्हाला ‘NO’ म्हणायचं आहे. यानंतर पेमेंट ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. यानंतर 23.60 रु. पेमेंट करावं लागेल.
प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला लॉटरी लागल्यानंतर ‘WINER’ हा मॅसेज प्राप्त होईल या नंतर कागदपत्रे अपलोड करावे लागतील अन् तुम्हाला तुमच्या बँक खात्यात अनुदान जमा होईल.
लॉटरी लागल्यानंतर आवश्यक कागदपत्रे :-
7/12 प्रमाणपत्र
8 – A प्रमाणपत्र
खरेदी करण्याचे साधन
उपकरणाचे कोटेशन (पंप,पाईप, शेततळे, ऑइल मिल, या घटकाकरीता)
केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त एजन्सीचे चाचणी प्रमाणपत्र ( मिल साठी)
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थीसाठी जात प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
हमीपत्र पूर्वसंमती पत्र