Take a fresh look at your lifestyle.

खुशखबर ! आता पीक कर्ज मिळवणं झालं आणखी सोपं, सिबिलची अट होणार रद्द ; सहकार आयुक्तांनी बँकांना दिले आदेश

0

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीककर्ज घेण्यासाठीच्या जाचक अटीतून आता शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज देताना यापुढे बँकांना ‘सिबिल स्कोअर’ची अट लावता येणार नाही. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळणे सोपे होणार आहे. पीक कर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी सिबिल ‘अथवा’ सिबिल स्कोअर’ चे बंधन घालू नये.

रिझर्व्ह बँकेच्या निर्देशात त्यासबंधीचे कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांनी सिबिल स्कोअरची अट न लावता शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावे, असे पत्र सहकार आयुक्तांनी राज्यस्तरीय बँकर्स कमिटीला पाठविले आहे.

कधी दुष्काळाची दाहकता तर कधी अतिवृष्टीची भीती असल्यामुळे शेतकरी कायमच संकटात असतो. या अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकटाचा सामना करणारे शेतकरी बँकेतून पीककर्ज घेतात. मात्र, त्याचा भरणा वेळेवर होत नाही. परिणामी, पुढील वेळी बँक कर्ज देत नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा

अडचणीत येतो. शेतकरी पीककर्ज घेतात. आलेल्या पैशांमधून ते पीक आणि पीक कर्जातून शेतात पेरणी केली जाते. मग या पिकातून कर्जाची परतफेड करीत असतात. शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या उभ्या पिकाला बँकेत तारण ठेवलेले असते . त्यामुळे पीक कर्जाला दुसऱ्या कोणत्या गोष्टीची गॅरंटी लागत नाही.

तरीदेखील बँका शेतकऱ्यांचे सिबिल पाहूनच त्यांना कर्ज देत असते. परंतु, पीक चांगले आले नाही तर कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे सिबिल खराब होते आणि त्यांना बँकेतून कर्ज मिळत नाही. परंतु, आता या सिबिलमधून शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे.

शेतकऱ्यांना पीककर्ज देताना वेगवेगळ्या बँकांचे ‘नो ड्यूज’ घेतले जाते. याचा अर्थ शेतकऱ्यांनी केवळ एकाच बँकेतून कर्ज घ्यावे, असा या बँक व्यवस्थेचा उद्देश असतो. परंतु, शेतकऱ्यांकडे नेमक्या कोणत्या बँकांचे पूर्वीचे कर्ज आहे अथवा त्या शेतकऱ्यांकडे थकीत कर्जाची माहिती बघण्यासाठीच बँका प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या सिबिलची माहिती घेत असतात.

शेतमालाला चांगला भाव मिळणे आवश्यक..

शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी सिबिलची अट सरकारने रद्द केली असली तरी यावरच शेतकऱ्यांचे भले होईल, असे शेतकऱ्यांना वाटत नाही. कारण जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळणार नाही आणि शेतकऱ्यांसाठी बँका प्रत्येक पिकानुसार जास्तीचे कर्ज देणार नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच राहतील, असेदेखील काही जाणकार शेतकरी सांगतात.

सिबिल स्कोअर महत्त्वाचा..

‘ट्रान्स युनियन सिबिल लिमिटेड’ ही खासगी कंपनी सिबिल तयार करते. सिबिल स्कोअर हा 300 ते 900 मध्ये गणला जातो. सिबिल स्कोअर ‘क्रेडिट हिस्टरीची माहिती दर्शवितो. 300 स्कोअर हा अतिशय कमी मानला जातो तर 900 स्कोअर असेल तर तो चांगला गणला जातो. 900 स्कोअर असलेले ग्राहक कर्जाची परतफेड करू शकतात, असे मानले जाते. बँकिंग आणि वित्तीय संस्थांमध्ये हा सिबिल स्कोअर महत्त्वाचा मानला जातो.

Leave A Reply

Your email address will not be published.