Take a fresh look at your lifestyle.

DA Hike : केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आत्ताचं सर्वात मोठं अपडेट, 1 जानेवारीपासून इतका महागाई भत्ता पगारासह खात्यात होणार जमा..

0

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आतापर्यंतचं सर्वात मोठं अपडेट हाती आलं असून त्यांचा जानेवारी 2023 साठीचा महागाई भत्ता निश्चित झाला आहे. आता त्यांना पगारासह नवीन दराने डीए (DA) वाढ मिळणार आहे. यासाठी लवकरच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतरच तो पगारासह खात्यात जमा होणार असून तो जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे.

सध्या जे आकडे आले आहेत ते केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पुरेसे आहेत. जानेवारी 2023 मध्ये त्याचा महागाई भत्ता किती वाढणार हे स्पष्ट झालं आहे.

4% ने वाढला महागाई भत्ता (DA)

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2023 सालातील सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे. महागाई भत्ता जाहीर करण्यात आला आहे. त्याचा महागाई भत्ता (DA Hike) 4% ने वाढला आहे. नवीन AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% ने वाढ होणार आहे. डिसेंबर 2022 मध्ये निर्देशांक 0.2 अंकांनी कमी होऊन 132.3 अंकांवर पोहोचला आहे. यापूर्वी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये हा आकडा 132.5 अंकांवर होता. यावरून महागाई भत्त्यात केवळ 4% वाढ होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

आता किती वाढणार महागाई भत्ता (DA) ?

महागाई भत्त्यात 4% वाढ केल्यानंतर आता तो 42% झाला आहे. आतापर्यंत 38% दराने महागाई भत्ता मिळत होता. पण, आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव दराने पैसे मिळणार आहेत. यापूर्वी जुलै 2022 मध्येही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.

CPI-IW मध्ये किती झाली घट ?

कामगार मंत्रालयाने अखिल भारतीय CPI-IW चा नवीन डेटा जारी केला आहे. 88 औद्योगिक केंद्रांच्या 317 बाजारांमधून घेतलेल्या किरकोळ महागाईच्या किमतीच्या आधारे डिसेंबरचा निर्देशांक जाहीर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. एका महिन्याच्या टक्केवारीच्या आधारे या आकडेवारीत 0.15 टक्क्यांची घट झाली आहे. दुसरीकडे, जर आपण वार्षिक आधारावर या महिन्याबद्दल बोललो, तर घट 0.24% आहे.

डीए वाढीसाठी महागाईचा दर नरमला..

7व्या वेतन आयोगाअंतर्गत औद्योगिक केंद्रांमधून घेतलेल्या CPI-IW आकड्यांवरून DA ची गणना केली जाते. त्यात किंचित घट झाल्याने निर्देशांकही बदलला आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये अन्नधान्य महागाई कमी होती. निर्देशांकानुसार, प्रथम अन्न आणि पेय CPI-IW नोव्हेंबरमध्ये 133.3 होता, तर डिसेंबरमध्ये तो 132.0 वर होता. पान,सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांमध्ये महागाई दिसून आली आहे.

नोव्हेंबरमध्ये निर्देशांक 148.7 अंकांवर होता, तर डिसेंबरमध्ये 149.2 अंकांची नोंद झाली आहे. कपडे आणि पादत्राणांचा आकडा 132.3 च्या तुलनेत 132.8 इतका होता. तर, गृहनिर्माण 121.0 अंकांवर फ्लॅट राहिले. इंधन आणि लाइटमधील महागाई 177.8 टक्क्यांवर कायम आहे. इतर श्रेणींमध्ये महागाई 129.1 वरून 130.0 अंकांपर्यंत वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.