केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी या वर्षातील सर्वात मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. कारण, त्यांच्या महागाई भत्त्यात (DA Hike) वाढ झाल्याचे चित्र स्पष्ट होणार आहे. कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोनदा महागाई भत्त्याचे गिफ्ट मिळते. महागाई भत्ता जाहीर होण्याची या वर्षातील ही दुसरी वेळ आहे. त्याचा DA 4% ने वाढेल अशी अपेक्षा आहे. अशा स्थितीत त्याचा एकूण डीए 46 टक्क्यांवर पोहचणार हे कन्फर्म झालं आहे.
सध्या 42% डीए दिला जात आहे. महागाई भत्ता जाहीर होताच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. विशेषत: मोठ्या पगाराच्या कर्मचाऱ्यांना प्रचंड फायदे मिळणार आहे.
महागाई भत्ता 46 टक्क्यांवर पोहचणार..
जुलै 2023 साठीचा महागाई भत्ता (DA) सप्टेंबरच्या अखेरीस जाहीर केला जाऊ शकतो. मात्र, अद्याप कोणतीही अंतिम तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, मंत्रिमंडळाकडून या महिन्यात मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. आत्तापर्यंत आलेल्या इंडस्ट्रियल व्हॅर्कर्सच्या आकडेवारीवरून 4% वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी, मार्च 2023 मध्ये महागाई भत्ता जाहीर करण्यात आला होता, ज्यामध्ये 4 टक्के वाढ झाली होती. त्यांचा डीए 38 टक्क्यांवरून 42 टक्के झाला होता..
4 टक्के वाढीमुळे पगार किती वाढणार ?
7व्या वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्सनुसार, लेव्हल – 1 मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी रेंज 18,000 रुपये ते 56,900 रुपये आहे. जुलैसाठी महागाई भत्ता 4% ने वाढल्यास एकूण DA 46 टक्क्यांवर पोहोचेल..
46% DA वर कॅल्क्युलेशन..
1. कर्मचार्यांची बेसिक सॅलरी रु. 18,000
2. अंदाजे महागाई भत्ता (46%) रु. 8,280 / महिना
3. नवीन महागाई भत्ता (42%) रु 7,560 / महिना
4. महागाई भत्ता किती वाढला ? 8,280 – 7,560 = रु 720 / महिना
5. वार्षिक पगारात वाढ 720X12 = रु. 8,640
म्हणजेच 18000 रुपये बेसिक सॅलरी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा 720 रुपयांची वाढ होणार आहे. वार्षिक आधारावर तो 8,640 रुपये असेल..
जर आपण लेव्हल – 1 कमाल पगाराच्या ब्रॅकेटमध्ये पाहिले तर पैसे किती वाढतील ?
46% DA वर कॅल्क्युलेशन..
1. कर्मचार्यांची बेसिक सॅलरी :- रु. 56,900
2. अंदाजे महागाई भत्ता (46%) :- रु. 26,174 / महिना
3. आत्तापर्यंत महागाई भत्ता (42%) :- रु. 23,898 / महिना
4. किती महागाई भत्ता वाढला :- 26,174 – 23,898 = रु. 2,276 / महिना
5. वार्षिक पगारात वाढ :- 2,276X12 = रु. 27,312
कमाल मूळ वेतन श्रेणीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा 2276 रुपयांची वाढ होणार आहे. वार्षिक आधारावर पाहिले तर 27,312 रुपयांची वाढ होईल..
एकूण महागाई भत्ता किती होणार ?
केंद्रीय कर्मचार्यांच्या लेव्हल -1 पे बँडमधील अप्पर ब्रॅकेट कर्मचार्यांची बेसिक सॅलरी 56,900 रुपये आहे. या कंसात पाहिल्यास एकूण महागाई भत्ता 46 टक्के असेल तर त्याच्या पगारातील महागाई भत्ता 26,174 रुपये होईल. वार्षिक आधारावर पाहिल्यास एकूण महागाई भत्ता 3 लाख 14 हजार 088 रुपये होईल..