Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्याला उद्योजक बनण्याची संधी। ‘या’ व्यवसायांसाठी मिळवा 35% अनुदानावर 10 लाखांचं कर्ज ; पहा, ऑनलाईन अर्ज प्रोसेस…

शेतीशिवार टीम : 2 सप्टेंबर 2022 :- केंद्र आणि राज्य शासनातर्फे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सर्वत्र राबविण्यात येत असून दौंड तालुक्यातील शेतीपूरक उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका लेव्हलवर कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केलं जातं आहे.

सदरची योजना ही शेतकरी उद्योजकांसाठी महत्त्वपूर्ण योजना असून पुणे जिल्ह्यातील 300 हून अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजने अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी व गट लाभार्थी जसे शेतकरी उत्पादक गट, संस्था, कंपनी, स्वयंसहायता गट व उत्पादक सहकारी संस्था यांना लाभ देय आहे.

योजना बँक कर्जाशी निगडित असून,वैयक्तिक लाभार्थ्यांना भांडवली गुंतवणुकीकरिता पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% व कमाल 10 लाख मर्यादित व गट लाभार्थ्यांना सामाईक पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणुकीसाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान देय आहे .

मार्केटिंग व ब्रँडिंगकरिता गट लाभार्थ्यांना पात्र प्रकल्प खर्चाच्या 50% अनुदान देय आहे. सदस्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेअंतर्गत शेतकरी उद्योजकांनी https://pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

पात्रता :-

अ ) वैयक्तिक लाभार्थी, भागीदारी संस्था, बेरोजगार युवक, महिला, प्रगतशील शेतकरी, मर्यादित भागिदारी संस्था (LLP), भागिदारी संस्था इ.

1. उद्योगामध्ये 10 पेक्षा कमी कामगार कार्यरत असावेत.
2. अर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकार (प्रोपायटरी / भागीदारी) असावा.

3. अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे व शिक्षण किमान आठवी पास असावा, तसेच एकाच कुटुंबातील एकच व्यक्ता पात्र असेल

4. सदर उद्योगाला औपचारिक दर्जा प्राप्त करुन देण्याची तयारी असावी.

5. पात्र प्रकल्प किंमतीच्या किमान 10-40 % लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बँक मुदत कर्ज घेण्याची तयारी असावी.

ब ) गट लाभार्थी शेतकरीगट / कंपनी / संस्था , स्वयंसहाय्यता गट , उत्पादक सहकारी संस्था इ. साठी…

1. “एक जिल्हा एक उत्पादन” (ODOP) धोरणानुसार निवडलेल्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये कार्यरत शेतकरी उत्पादक गट / कंपनी / संस्था / स्वयं सहायता गट / उत्पादक सहकारी संस्था यांना नवीन उद्योगाना प्राधान्य दिले जाईल.

2. कंपनीची उलाढाल ही किमान रु .1 कोटी असावी .

3. कंपनीच्या सध्याच्या आर्थिक उलाढालीपेक्षा अधिक किंमतीचा प्रस्ताव असू नये.

4. कपनीच्या सभासदांना हाताळल्या जाणाऱ्या उत्पादनाबाबत पुरेशे ज्ञान व अनुभव असावा, तसेच सदर उत्पादनाच्या बाबतीतील किमान 3 वर्षाचा अनुभव असावा.

किती मिळेल अनुदान :-

या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी व उद्योजकांना वैयक्तिक लाभासाठी 35% अनुदानासह 10 लाखांचं कर्ज मिळतं. तसेच या योजे अंतर्गत जो काही टेक्निकल सपोर्ट हवाय तो ही मिळणार आहे.

मार्केटिंग व ब्रॅन्डींगसाठी 50% अनुदान कमाल निधी केंद्र शासनाच्या विहीत मर्यादेत स्वयंसहाय्यता गटांतील सदस्यांना बीज भांडवल रु.40,000 / प्रति सदस्य ( ग्रामीणसाठी MSRLM व शहरीसाठी MSULM मार्फत )

इन्क्यूबेशन सेंटर अनुदान शासकीय संस्था- 100%, खाजगी संस्था – 50% अनुसुचित जाती व जमाती- 60%

प्रशिक्षणासाठी लाभार्थ्यांना 100% अनुदान

भांडवली गुंतवणुक व सामाईक पायाभूत सुविधा, गट लाभार्थी 35% अनुदान कमाल केंद्र शासनाच्या विहित मर्यादेत…

कोणत्या व्यवसायासाठी मिळेल हे अनुदान :-

* सागरी उत्पादने :- मत्स्य मासे लोणचे, सुकवलेले मासे, डबाबंद मासे, खारवलेले मासे, गोठवलेले मासे, चिप्स, वेफर्स, पापड, फिश,Popcorn, नगेट्स, टिक्की, समोसा, पकोडा, इत्यादी

*नाचणी :- पीठ, पापड, बिस्कीटे, कुकीस, नाचणी सत्व, चकली, इडली, शंकरपाळी, इत्यादी .

* भगर :- पीठ, भगर, इत्यादी.

* चिकू – स्कॅश, पल्प, जाम, जेली, नेक्टर, स्लाईसेस, आईसक्रिम, कँडी, पावडर, ज्यूस, चॉकलेट, चॉकलेटबार,

* फ्रुटबार, वडी, ड्रायफ्रूट बर्फी फ्लेक्स, इत्यादी

* आंबा पल्प, जाम, जेली, मुरंबा, स्कॅश, नेक्टर, कोकटेल, स्लाईसेस, आईसक्रिम, ड्राइड स्लाईसेस, डबाबंद ज्यूस, गोठवलेले लोणचे, चटणी, फुटबार, लश, सॉस, कुंदा, सॉफ्टकॅडी, अल्कोहल विरहित पेय, इत्यादी.

* कांदा – फ्राईड कांदा, Dehydrated Onion Flakes, पेस्ट, पावडर, Strips, ऑईल, सॉस लोणचे इत्यादी.

* टोमॅटो केचअप, जाम, प्यूरी, टोमॅटो सॉस, पेस्ट, टोमॅटो चटणी, RTE, सूप, ज्यूस, लोणचे, इत्यादी.

* दुग्ध व दुग्धजन्य – बासुंदी, पनीर, लोणी, चीझ, आईसक्रिम, तूप, लस्सी, श्रीखंड, ताक, पेये, विप क्रिम, फॅट मिल्क, दही, दूध पावडर, व्हे प्रोटीन, खवा, मावा, छन्ना, संदेश पेढा, कलाकंद, कुल्फी, रबडी, बर्फी, चक्का, श्रीखंड वडी, रसमलाई, रसगुल्ला, इत्यादी .

* ज्वारी – Flakes, पिठ, पापड, माल्ट, कुकीज, स्टार्च, इत्यादी.

* गहू – Flakes, पिठ, ब्रेड, माल्ट, बिस्कीट, कुकीज, स्टार्च, इत्यादी.

* गुळ – गूळ पावडर, ज्यूस, यीस्ट, मॉलॅसेस, काकवी, इत्यादी.

द्राक्षे :- बेदाणा, वाईन, ज्यूस, व्हेनेगर, Sweet spreads, मनुका , वाईन स्वॅश इत्यादी.

PMFME Scheme 2022 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी रजिस्ट्रेशन कसे कराल ?

PMFME योजनेत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्ही प्रथम प्रधानमंत्री मायक्रो फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज योजनेच्या अधिकृत वेब पोर्टल https://www.mofpi.gov.in/ वर जावे

या नंतर वेब पोर्टलमध्ये https://pmfme.mofpi.gov.in/pmfme/#/Login वर जा.
त्यानंतर ऑनलाइन नोंदणी लिंकवर क्लिक करा.
साइन अप बटणावर क्लिक करा.
नवीन युजर्स रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल.
सर्व माहिती प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
यशस्वी नोंदणीकृत युजर्सच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर युजर्स नेम आणि पासवर्डसह ईमेल प्राप्त होईल. रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरही मेसेज प्राप्त होईल.
युजर्स नेम आणि पासवर्ड मिळाल्यावर, युजर्स सिस्टममध्ये लॉग इन करू शकतो.

PMFME Scheme 2022 योजनेमध्ये ऑनलाइन अर्ज कसा कराल ?

pmfme mofpi वेब पोर्टलवर जा. त्यानंतर लॉगिन बटणावर क्लिक करा.

यूजर आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही पोर्टलवर लॉग इन कराल.

कृपया लक्षात घ्या की, तुम्ही तुमची विभाग निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाचा प्रकार बदलता येणार नाही.

पोर्टलवर तुमची विभाग निवडा.

Apply Online बटणावर क्लिक करा.

ऑनलाइन अर्जावर क्लिक केल्यावर युजर्स 7 विभागांमध्ये स्वतंत्रपणे फॉर्म भरण्यास सक्षम असेल.

विभागांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

अर्जदार तपशील (Applicant details)
सध्याचा उद्योग उपक्रम
प्रस्तावित व्यवसाय वर्णन
आर्थिक विवरण
कर्ज देणारी बँक
कागदपत्रे अपलोड करा
घोषणा आणि सबमिट करा
सर्व माहिती भरा आणि फॉर्म सबमिट करा.

टीप :- जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यास अडचण येत असेल तर तुम्ही जनसेवा केंद्र (सेतू) ला सर्व कागदपत्रांसह भेट द्या.

फॉर्म मंजूर झाल्यांनतरराज्य नोडल एजन्सी प्रस्तावाचे मूल्यमापन करेल आणि राज्यस्तरीय मान्यता समिती (SLAC) च्या शिफारशीसह अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडे पाठवलं जाईल. त्यानंतर कर्ज मंजुरीसाठी बँकेकडे प्रस्ताव पाठवला जाईल. सामायिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी सहाय्यासाठी अर्ज करण्यासाठी हीच प्रक्रिया अवलंबली जाणार आहे.