पुणे – दौंड मार्गावर आता इलेक्ट्रिक लोकलने तासाभरात प्रवास, या 10 स्टेशन्सवर आहे थांबा, पहा टाइम टेबल..
पुणे – दौंडदरम्यान पहिली इलेक्ट्रिक लोकल सोमवारी धावली. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. नुकताच दौंडसह सोलापूर विभागातील बहुतांश परिसर पुणे विभागात समाविष्ट झाला आहे..
दौंड ते पुणे दरम्यान नियमित प्रवास करणारे हजारो प्रवासी आहेत. यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह कामगार वर्ग, शेतमाल वाहून नेणारे शेतकरी, अन्य छोटे व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक तसेच वैद्यकीय कारणासाठी पुण्यात येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचाही समावेश आहे. हजारोंच्या संख्येने दौंड ते पुणे आणि पुणे ते पुन्हा दौंड असा ह प्रवास करणाऱ्या या प्रवाशांच्या २ सोयीसाठी मधल्या काळात खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने पाठपुरावा करत या मार्गावर मेमू सुरू करावी, यासाठी प्रयत्नशील होत्या.
रेल्वे खात्याने ११ एप्रिल २०२२ पासून या मार्गावर मेमू या रेल्वे नियमितपणे सुरू केली. अनेक वेळा सुळे यांनी त्यासाठी निवेदने देण्याबरोबरच प्रत्यक्ष ठर भेटी घेऊनही आपली मागणी रेल्वे मंत्र्यांकडे मांडली होती. या सततच्या पाठपुराव्याला आता यश मिळाले आहे.
गेली दोन वर्षे मेमू रेल्वे व दौंडकरांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून हजारो प्रवाशांचा प्र वेळ आणि पैसा वाचत आहे.
दरम्यान, याचाच एक भाग म्हणून सोमवार, २० मेपासून रेल्वे खात्याने आणखी बारा बोगी या गाडीला जोडल्या.
दौंडला उपनगरचा दर्जा मिळेल – पुणे आणि येथून इलेक्ट्रिक लोकल सेवा सुरू होईल, अशी प्रवाशांना आशा वाटत होती. यासंदर्भात अनेक प्रवासी आणि प्रवासी संघटनांची मागणी होती. दरम्यान, सोमवार, २० मेपासून या मार्गावर पहिली इलेक्ट्रिक लोकल सुरू झाली. १२ डबे असलेली ही इलेक्ट्रिक लोकल पुढील काही दिवस पुणे – दौंडदरम्यान प्रवास रेल्वे करणाऱ्या प्रवाशांना सेवा पुरवणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी आणि प्रवासी संघटनांमध्ये आनंदाचे
वातावरण आहे.
टाइम टेबल..
दौंड – पुणे मेमू एक्स्प्रेस स्पेशल डीडी (दौंड जंक्शन) ते पुणे (पुणे जंक्शन), आठवड्याचे ७ दिवस धावते.
पॅसेंजर ट्रेन दौंड जंक्शन येथून 05:02 वाजता सुटते आणि 06:32 वाजता पुणे जंक्शनला पोहोचते.
ट्रेन 1 तास 30 मिनिटांच्या एकूण वेळेत प्रवास करते आणि प्रवासादरम्यान 11 स्थानकांवर थांबते.
ही गाडी पाटस, कडेठाण, केडगाव, खुटबाव, येवत, उरुळी, लोणी, मांजरी बुद्रुक, हडपसर येथे सर्वात जास्त वेळ, जास्तीत जास्त 1 मिनिट थांबते..