Govt Employees : सरकारी कर्मचाऱ्यांच्या PF बाबत मोठं अपडेट, जानेवारी-मार्चसाठी GPF सह लहान बचत ठेव योजनांचे दर जाहीर..
General Provident Fund : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. सरकारने सामान्य भविष्य निर्वाह निधीचे व्याजदर जाहीर केले आहेत. वित्त मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी GPF आणि इतर तत्सम निधीचे व्याजदर 7.1% वर ठेवले आहेत. 31 डिसेंबर रोजी संपलेल्या शेवटच्या तिमाहीत GPF वरील व्याज दर 7.1% होता.
अर्थ मंत्रालयाने मंगळवारी एका अधिसूचनेत सांगितलं की, हा दर 1 जानेवारी 2023 ते 31 मार्च 2023 पर्यंत वैध आहे. हा दर 1 जानेवारी 2023 पासून लागू आहे. सरकार प्रत्येक तिमाहीसाठी GPF आणि CPF, AISPF, SRPF, AFPPF सारख्या इतर तत्सम निधीसाठी व्याजदर जाहीर करते.
GPF किंवा सामान्य भविष्य निर्वाह निधी म्हणजे काय ?
GPF ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे, जी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी चालवली जाते. या योजनेंतर्गत कर्मचार्यांना त्यांच्या पगारातील काही टक्के रक्कम या योजनेत टाकण्याची मुभा आहे आणि त्यांचे योगदान या निधीत जमा होत राहते. ते निवृत्त झाल्यावर त्याची संपूर्ण रक्कम त्याला दिली जाते.
सरकार दर तिमाहीत GPF च्या व्याजदरात सुधारणा करते. 7.1% चा हा दर इतर सरकारांद्वारे चालवल्या जाणाऱ्या भविष्य निर्वाह निधीसाठी देखील लागू आहे, जसे की अंशदायी भविष्य निर्वाह निधी, ऑल इंडिया सर्व्हिसेस प्रॉव्हिडंट फंड, सशस्त्र दल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, राज्य रेल्वे भविष्य निर्वाह निधी इ..
पीपीएफच्या व्याजदरात कोणताही बदल नाही, परंतु लहान बचत योजनांना मिळणार अधिक रिटर्न्स :-
गेल्या आठवड्याच्या अपडेटमध्ये, सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरातही सुधारणा केली होती, परंतु त्याच्या दरांमध्येही कोणताही बदल झालेला नाही. त्याचे दर देखील 7.1% वर कायम आहेत. परंतु, पोस्ट ऑफिस एफडी, एनएससी आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसह लहान बचत ठेव योजनांवरील व्याजदर 1.1 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. हा नवा दर 1 जानेवारीपासून लागू झाला आहे. मुख्यतः अशा पोस्ट ऑफिस योजनांचे व्याज वाढवण्यात आले आहे, ज्यावर आयकर लाभ मिळत नाहीत. ‘सुकन्या समृद्धी’ या मुलींच्या बचत योजनेच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.
वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, NAC, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि किसान विकास पत्र (KVP) वरील व्याजदर 1.1 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. या योजनांमधून मिळणारे उत्पन्न करपात्र आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) वर 1 जानेवारीपासून 7% दराने व्याज मिळणार आहे.
तसेच ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर सध्याच्या 7.6% व्याजाच्या तुलनेत 8% व्याज मिळत आहे. पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनेवरील व्याजदर 1 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी 1.1 टक्क्यांनी वाढले आहेत. मासिक उत्पन्न योजनेतही 6.7 टक्क्यांऐवजी आता 7.1% व्याज मिळत आहे.