भारतीय रेल्वेचे नेटवर्क जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठं नेटवर्क आहे. एवढ्या मोठ्या देशात अशा डझनभर ट्रेन धावतात ज्या देशाचा एक कोपरा दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जोडला जातो. या लेखात आपण देशातील सर्वात लांब अंतराचा प्रवास करणाऱ्या ट्रेनबद्दल जाणून घेणार आहोत. ही ट्रेन सुमारे 4300 किलोमीटर लांब अंतर कापते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 80 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.
देशातील सर्वात लांब मार्गाच्या ट्रेनचे नाव विवेक एक्सप्रेस (Vivek Express) आहे. 2011-12 च्या रेल्वे अर्थसंकल्पात या ट्रेनची घोषणा करण्यात आली होती. स्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ही घोषणा करण्यात आली.
ती आसाममधील दिब्रुगढ ते तामिळनाडूमधील कन्याकुमारीपर्यंत जाते. ही भारतातील सर्वात लांब पल्ल्याची ट्रेन आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या बाबतीत, ती जगात 24 व्या स्थानावर येते.
दिब्रुगड ते कन्याकुमारी हे अंतर सुमारे 4300 किलोमीटर आहे. भारतीय रेल्वेच्या मते, विवेक एक्सप्रेस ही भारतातील सर्वात लांब पल्ल्याच्या ट्रेनपैकी एक आहे. या प्रवासादरम्यान ही ट्रेन 57 स्थानकांवर थांबते आणि एकूण 9 राज्यांमधून जाते. हीच ट्रेन ईशान्य भारताला दक्षिण भारताशी जोडण्याचे काम करते.
विवेक एक्सप्रेस आसाम, नागालँड, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, केरळ मार्गे तामिळनाडूला पोहोचते. अशा प्रकारे तो 9 राज्यांमधून जाते.
दिब्रुगढ-कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस (Dibrugarh–Kanyakumari Vivek Express) ही साप्ताहिक ट्रेन आहे. परंतु, भारतीय रेल्वेने ही ट्रेन 20 नोव्हेंबरपासून आठवड्यातून दोनदा चालवण्याची घोषणा केली आहे.
या ट्रेनमध्ये 19 डबे आहेत. 3 एसी कोच आहेत. 6 जनरल डबे आहेत आणि 9 स्लीपर क्लास आहेत. ट्रेनमध्ये पॅन्ट्री कारही आहे. ट्रेन क्रमांक 15905- 15906 आहे जी दोन्ही दिशेने धावते.
किती आहे तिकीट..
आसाममधील दिब्रुगढ ते तामिळनाडूमधील कन्याकुमारीपर्यंत तिकीट दर – SL – 1070 । 3A – 2790 । 2A – 4225 इतके आहे.
विवेक एक्सप्रेस नंतर सर्वात लांब पल्ल्याच्या ट्रेन :-
सर्वात लांब अंतर कापणाऱ्या ट्रेनमध्ये विवेक एक्सप्रेस अव्वल स्थानावर आहे.
दुसरा क्रमांक सिलचर ते तिरुवनंतपुरम सुपरफास्ट ट्रेनचा आहे, जी 3,931 किलोमीटरचे अंतर सुमारे 76.5 तासात कापते.
तिसर्या क्रमांकावर कटरा ते कन्याकुमारीला जोडणारी हिमसागर एक्स्प्रेस आहे. ही ट्रेन अंदाजे 73 तासांत 3,797 किलोमीटरचे अंतर कापते.