नेदरलँडमधील एका ‘रिव्हर्स ब्रिज’चा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसत नाही. पुलाचे ड्रोन फुटेज समोर आले असून, त्यामध्ये तेथून जाणारी वाहने काही सेकंदांसाठी पाण्यात अचानक गायब झाल्याचे दिसून येत आहे पहिल्यांदा पाहिल्यावर असं वाटतं की हा व्हिडीओ अँनिमेटेड असावा..पण तसं नाहीये !

अल्विन फू नावाच्या युजरने ट्विटरवर रिव्हर्स ब्रिजचा व्हिडिओ शेअर केला आहे. पुलावरून काही वाहने जात असल्याचे दृश्य आहे, जे पुलाच्या अगदी मध्यभागी म्हणजेच पाण्याच्या भागात अचानक गायब होतात आणि काही सेकंदांनंतर पुन्हा पुलाच्या दुसऱ्या बाजूला दिसतात.

प्रथमच व्हिडिओ पाहून तुम्हाला असे वाटेल की, वाहने पाण्याखाली गायब होऊन पुन्हा पुलाच्या पलीकडे दिसतात. वास्तविक रस्त्याचा पृष्ठभाग पाण्याखाली बनविला गेला आहे आणि त्यावर पाणी वाहून जाण्याची व्यवस्था आहे, जेणेकरून पाण्याच्या मार्गात कोणताही बदल होणार नाही.

हा व्हिडिओ काही वेळापूर्वी शेअर करण्यात आला असून तो चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 9.4 मिलियन लोकांनी पाहिला आहे. ट्विटर यूजर्स यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

हा पूल 2002 मध्ये लोकांसाठी खुला करण्यात आला आणि बहुतेक नेदरलँड्सला जगातील सर्वात मोठे कृत्रिम बेट असलेल्या फ्लेव्होलँडशी जोडतो. त्याचे ड्रोन फुटेज Rutger Den Hertos यांनी टिपलं आहे.

या अंडरपासवरून दररोज सुमारे 28 हजार गाड्या जातात. हा पूल 22,000 क्यूबिक मीटर काँक्रीटचा बनलेला आहे, ज्यामुळे तो वरच्या प्रवाहात वाहणाऱ्या पाण्याचे वजन आणि बोटींचं वजन सामावू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *