गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत (म्हाडा) विविध गृहयोजनांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुकांसाठीची प्रक्रिया सोपी झाली असून त्यामुळे क्लिष्ट पद्धतीतून अर्जदारांची सुटका होणार आहे. संगणकीय प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेपाला आता आळा बसणार आहे. दरम्यान, पुणे मंडळाच्या म्हाडाच्या 5 हजार 915 सदनिकांच्या सोडतीचा आज 5 जानेवारी रोजी शुभारंभ करण्यात आला असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
म्हाडाच्या विविध योजनेतील 2 हजार 925 सदनिका, 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील 2 हजार 594, म्हाडा प्रधानमंत्री आवास योजनेतील 396 अशा 5 हजार 915 घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे.
एकाच नोंदणी क्रमांकावरून मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोकण यासारख्या मंडळांच्या घरांच्या सोडतीसाठी नोंदणी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
म्हाडाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या सोडतीमध्ये मानवी हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला जात होता. त्या आरोपामुळे म्हाडाने अजांची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि मानवविरहित करण्यासाठी नवी संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या संगणकीय प्रणालीच्या आधारेच आता म्हाडाची अर्ज भरण्याची प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळेच आता अर्जदारांना अज भरणे अगदी सोपे झाले आहे. पूर्वीच्या क्लिष्ट पद्धतीतून त्यांची सुटका झाली आहे.
पूर्वी लाभार्थी हे बांधकाम व्यावसायिकांशी वेळेत करार करत नव्हते. आता नव्या पद्धतीनुसार लाभाथ्यांसह बांधकाम व्यावसायिकांना त्वरित करार करावा लागणार आहे. करार न केल्यास पुढील लाभार्थ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. लाभाथ्यांनी तीन महिन्यांच्या आत घरांची प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित आहे. ती पूर्ण झाली नाही, तर पुढील प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना घर घेण्याची संधी मिळणार आहे.
बांधकाम व्यावसायिकांनीसुद्धा दिलेल्या मुदतीत लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. प्रकल्प पूर्ण वेळेत केला नाही तर व्यावसायिकांवर कारवाई होणार आहे. सर्व लाभाथ्यांना बांधकाम व्यावसायिकाने इंडेक्स ची प्रत दिल्यास त्याची एक प्रत म्हाडाकडे दिल्यानंतर महाडाकडून बांधकाम प्रकल्प पूर्णत्वाचा दाखला मिळविण्यासाठी महापालिकाना ओसी देणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :-
आता केवळ आधार कार्ड तसेच (आधारकार्ड मोबाइल क्रमांकाशी लिंक असावा), पॅनकार्ड, सध्याच्या वास्तव्याचा पुरावा, अर्जदाराच्या आधारकार्डवरील पता हा सध्याच्या पत्त्यापेक्षा वेगळा असल्यास अर्जदाराने सध्याचा पत्ता नोंद करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, तहसीलदार यांनी दिलेले अधिवासपत्र (अधिवास प्रमाणपत्र हे चालू पाच वर्षांमधील असावे त्यावर क्यूआर कोड असणे आवश्यक आहे)
स्वतःचा उत्पन्नाचा पुरावा, आयकर परतावा प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पनाचा पुरावा, पती किंवा पत्नीच्या उत्पन्नाचा पुरावा, पती किंवा पत्नीचे आयकर परतावा प्रमाणपत्र (नोकरी असल्यास) किंवा तहसीलदारांनी दिलेल्या उत्पन्नाचा पुरावा आवश्यक असणार आहे.
पूर्वीच्या पद्धतीतील लाभार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. सोडतीनंतर अर्जदाराची पात्रता निश्चिती, अर्ज भरताना विविध प्रकारच्या 21 कागदपत्रांची आवश्यकता, मानवी पद्धतीने कागदपत्रांची पडताळणी, सोडतीपासून सदनिका मिळेपर्यंत लागणारा प्रदीर्घ काळ यामुळे म्हाडाला मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होत होता.
अर्जदाराची पात्रता ही सोडतीपूर्वीच ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे त्यासाठी सात कागदपत्रांची आवश्यकता भासणार. संगणकीय प्रणालीद्वारे अचुक कागदपत्रांची पडताळणी होणार. पात्र केलेल्या लाभार्थ्यांनाच सोडतीत घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पात्र लाभाथ्यांची कागदपत्रे सुरक्षित राहणार आहेत. दरम्यान , सोडतीनंतर निकाल अँप, ई – मेल, एसएमएसद्वारे तत्काळ कळणार आहे.
अर्ज कसा कराल ?
अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Pune/NewUser.do या वेबसाईटवर जावं लागणार आहे.
आज 12 वाजल्यापासून अर्ज प्रक्रियेला झाली सुरुवात..
PUNE MHADA Lottery 2023 :- हेल्पलाईन नंबर :- Helpline No. 02226598924 / 9834637538