मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जबाबदारी असलेल्या ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’ (MSRDC) कडून वर्षारंभी राज्यातील जनतेस हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकर महाराष्ट्र समृद्धा महामार्गा’ची भेट मिळाली. राज्यातील शेतकरी आणि उद्योग – व्यवसाय यांस समृद्धीच्या मागांवर आणणाऱ्या या प्रकल्पाचा काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकर महाराष्ट्र, समृद्धी महामागाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या 520 किलोमीटरच्या टप्याचे लोकार्पण करण्यात आले.
जर्मनीतील ‘बुडसऑटोबान’ या महामार्गाच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाचे दुसऱ्या शिर्डी ते मुंबई या टप्प्याचे काम सध्या प्रगतीपथावर असून येत्या डिसेंबरमध्ये हा महामार्ग प्रवाशांसाठी खुला होणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
शिर्डी ते मुंबईपर्यंतचा टप्पाही देत्या डिसेंबरमध्ये वाहतूकीसाठी खुला हाण्याचे संकेत मिळाले आहे. हा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर मुंबई – नागपुर प्रवासासाठी लागणारा 15 ते 16 तासांचा कालावधी जवळ जवळ निम्म्याने कमी होऊन, 7 ते 8 तासांवर येणार आहे.
त्याचबरोबर या वर्षी यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai – Pune Expressway) प्रवासाच्या वेळेत आणखी बचत होणार आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’चे कामही आता प्रगतीपथावर आहे.
या मार्गावरील खालापूर खोपोली इंटरचेंज हा 5.86 किमी लांबीच्या रस्त्याचे 8 पदरीकरण करून आणि खोपोली एक्झिट ते कुसगाव (सिंहगड संस्था) ते या भागातील 13.3 Kmच्या राहिलेल्या लांबीसाठी दोन बोगदे आणि दोन ‘व्हायाडक्ट’ सह एकूण 19.84Km लांबीचा आठ पदरी रस्ता बांधून ही ‘मिसिंग लिंक’ सांधली जाणार आहे.
6695.37 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे सध्याच खोपोली एक्झिट ते सिंहगड संस्था हे 19Km चे अंतर 6 किमीने कमी होऊन प्रवासाच्या वेळेत 20 ते 25 मिनिटांची बचत होणार आहे. हे कामही या वर्षात पूर्णत्वास जाणार आहे.
प्रगतीपथावरील प्रकल्प आणि खर्च..
वर्सोवा – वांद्रे सागरी सेतू :- रु. 11,332.82 कोटी
ठाणे खाडी पूल क्र. 3 :- रु. 775.58 कोटी
राष्ट्रीय महामार्गाची कामे :- रु. 9,630 कोटी
जीएसटी भवन वडाळा :- रु 1890 कोटी
वडपे ते ठाणे रस्त्याचे आठ पदरी रुंदीकरण (मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग 848) रु. 1182.87 कोटी
भिवंडी – कल्याण – शिळफाटा रस्त्याचे सहा पदरी रुंदीकरण :- रु. 561 कोटी