Take a fresh look at your lifestyle.

Good News : अंगणवाडी सेविकांसह कोतवालांच्या मानधनात दुपटीने वाढ, शासन GR जाहीर, पहा एप्रिलपासून ‘इतके’ मिळणार वाढीव वेतन..

0

कुपोषण निर्मूलनाबरोबरच पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना राज्य शासनाने जाहीर केलेली दीड हजाराची मानधनवाढ चालू एप्रिल महिन्यापासूनच मिळणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय महिला व बालविकास विभागाने जाहीर केला आहे.

अंगणवाडी सेविकांना आता सेवा कालावधीनुसार 10 हजार ते 10 हजार 500, मदतनिसांना 5 हजार 500 ते 5 हजार 775 तर मिनी अंगणवाडी सेविकांना 7 हजार 200 ते 7 हजार 560 इतके मानधन मिळणार आहे. या मानधनवाढीचा राज्यातील सुमारे 2 लाख 7 हजार 961 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मानधनवाढीची अंगणवाडी प्रमुख मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शासनाने बेदखल ठरविली होती. अनेक वेळा निवेदने दिली, निदर्शने केली, मोर्चे काढले तरी शासनाला जाग आली नाही.

अखेर एक तर सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या किंवा किमान मानधनात तरी बाद करा, अशी मागणी घेऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण राज्यभरात लढा पुकारला.

अंगणवाड्या बंद ठेवून कर्मचाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या लढयाला विरोधी पक्षानेत्यांनी साथ देऊन विधानसभेतही आवाज उठविला. तेव्हा कुठे सरकारला जाग आली आणि अधिवेशनातच मानधनवाढीची घोषणा केली.

परंतु ही मानधनवाढ कधीपासून मिळणार याबाबत कर्मचाऱ्यांत संभ्रम होता. आता शासन निर्णय निघाल्याने मानधनवाढीवर शिक्कामोर्तब झाले आणि संभ्रमावस्थाही दूर झाली. शासन निर्णयानुसार सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन मानधनवाढ करण्यात आली आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनीस, कोतवालांचे सुधारित मानधन पाहण्यासाठी..

इथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.