अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना चालू महिन्यापासून वेतनवाढ..
कोतवालांच्या मानधनात दुपटीने वाढ..
महसूल विभागातील शेवटचा घटक म्हणून काम करणाऱ्या कोतवालांच्या मानधनात राज्य शासनाने दुपटीने वाढ केली असून कोतवालांना आता सरसकट 15 हजार रुपये मानधन मिळणार आहे याची अंमलबजावणीही चालू एप्रिल महिन्यापासूनच करण्यात येणार असून याचा शासन निर्णय महसूल विभागाने जाहीर केला आहे.
याचा राज्यातील 12 हजार 793 कोतवालांना लाभ होणार आहे. गाव पातळीवर काम करणाऱ्या कोतवालांना 7 हजार 500 रुपये इतके तुटपुंजे मानधन देण्यात येत होते. कोतवालांचे कामाचे स्वरूप, त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या विचारात घेऊन शासनाने त्यांच्या मानधनात 7 हजार 500 रुपयांची घसघशीत वाढ केली आहे.