ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 195 पैकी 10 ग्रामपंचायती बिनविरोध निवडूण आल्याने 185 ग्रामपंचातीमधील सदस्यांसह सरपंच पदाच्या निवडणुकीत 3 लाख 77 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, रविवारी ( दि .18) शांततेत सरासरी 75 ते 85% मतदान पार पडले .
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये राजकीय पुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून काही ठिकाणी काट्याची टक्कर असल्याचे दिसून आली . निवडणूकीदरम्यान, सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांचा मोठा उत्साह दिसून आला.
मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या रांगा होत्या. एकुण मतदानादरम्यान , कुठेही अनुचित प्रकाराची नोंद नसल्याचे किंवा ईव्हीएम मशिन बंद पडल्याची कुठेही घटना घडली नसल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून आता हळूहळू निकाल समोर येत आहे. जिल्ह्यात अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
बिनविरोध झालेल्या निवडणुका..
नगर तालुका :- पिंपळगाव लांडगा
श्रीरामपूर तालुका :- शिळवंडे , सोमालवाडी, कमालपूर, वांगी खुर्द
नेवासा :- चिंचबन
राहाता तालुका :- लोहगाव
श्रीगोंदा तालुका :- बनपिंप्री
संगमनेर तालुका :- डोळासणे, सायखिडी,
अकोले तालुका :- शिरेगाव , हिंगोणी
आत्तापर्यतचे आलेले निकाल :-
बेलवंडी ग्रामपंचायत :-
श्रीगोंदे तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींचे निकाल पहिल्या टप्प्यात जाहीर झाले असून राजकीय दृष्ट्या बहुचर्चित असलेली बेलवंडी ग्रामपंचायतमध्ये सत्तापालट झालं असून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी यंदा गड राखला आहे. अण्णासाहेबांचे पुत्र ऋषिकेश अण्णासाहेब शेलार 3313 च्या फरकाने प्रचंड मतांनी विजयी झाले असून 18-0 अशा फरकाने विरोधकांचा धुव्वा उडवला आहे.
काष्टी ग्रामपंचायत :-
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या बहुचर्चित कष्टी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट माजी मंत्री, आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबातच फूट पडली असून आ. पाचपुते यांनी मुलगा प्रताप यांना सरपंचपदाची उमेदवारी दिल्याने आमदार पाचपुते यांचे बंधू स्व. सदाशिव पाचपुते यांचे चिरंजीव साजन पाचपुते यांनी बंड करत विरोधी बाजूंकडूने सरपंचपदासाठी उभे असल्याने काष्टीत ग्रामपंचायत निवडणुकीत सख्खे चुलत भाऊ आमनसामने आले असून सध्या अटीतटीचा सामना सुरु आहे.
आत्तापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, साजन बेंद्रे गटाने आघाडी घेतली असून कष्टी वार्ड क्रमांक :- 1 व 2 च्या प्रत्येकी तिन्ही जागा साजन बेंद्रे गटाने जिंकल्या असून आ बबनराव पाचपुते यांनी मोठा धक्का देत साजन पाचपुते यांनी 190 मतांनी विजय मिळवला आहे.
1) थिटे सांगवी – सरपंच – अर्जुन रामचंद्र शेळके – 68 मतांनी विजयी. एकुण पडलेली मते – 457 (काँग्रेस)
2) चवरसांगवी – सरपंच – सुनिता माळशिकारे- 3 मतांनी विजयी. एकुण पडलेली मते – 125 (काँग्रेस)
3) तरडगव्हाण- सरपंच- कुंदा बेरड राजेंद्र – 7 मतांनी विजयी. एकुण पडलेली मते – 331 (भाजप)
4) माठ – सरपंच – अरुण विश्वनाथ पवार – 395 मतांनी विजयी. एकुण पडलेली मते – 722 (भाजप)
5) घोगरगाव – सरपंच – सुजाता मिलिंद भोसले- 101 मतांनी विजयी. एकुण पडलेली मते- 1373 (राष्ट्रवादी)
6) तांदळी दुमाला – सरपंच – संजय मारुती निगडे – 161 मतांनी विजयी. एकुण पडलेली मते- 1202 (राष्ट्रवादी)
7) पारगाव सु।। – सरपंच – सुरेखा दत्तात्रय हिरवे, 104 मतांनी विजयी. एकुण पडलेली मते- 2170 (राष्ट्रवादी)
8) बेलवंडी बु।। – सरपंच- ऋषिकेश आण्णासाहेब शेलार – 3313 मतांनी विजयी. 18-0 (राष्ट्रवादी)
नेवासा :-
नेवासा तालुक्यातील पहिल्या टप्प्यात नेवासे तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून शंकरराव गडाख गटाचे वर्चस्व राहिले आहे.
तालुक्यातील चर्चेची ग्रामपंचायत असलेल्या कांगुनी ग्रामपंचायतीवर भाजपचे 11 पैकी 8 सदस्य निवडून आले. गडाख गटाचे सरपंच पदासह 4 सदस्य निवडून आले.