राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गेल्या 3-4 दिवसांपासून कांद्याची मोठी आवक सुरू आहे. सरासरी 1500 ते 2500 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विक्रीसाठीचा ओघ वाढला आहे.
गेल्या 10 ते 15 दिवसांपासून कांद्याची आवक कमी झाल्यामुळे बाहेरील मागणी वाढली होती त्यामुळे आता भावातही वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक चित्र आहे. काल घोडेगाव बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याला जास्तीत जास्त 2300 रुपयांप्रमाणे तर राहुरी – वांबोरी बाजार समितीत 2500 पर्यंत दर पोहचले होते. यामध्ये लाल कांद्याला 800 रुपयांपासून 2200 रुपयांपर्यंत दर मिळाला तर जुना उन्हाळी कांद्यास 200 रुपयांपासून 2300 रुपयांपर्यंत दर मिळाला .
श्रीरामपूर बाजार समितीत कांद्याला 1800 रुपयावर भाव :-
श्रीरामपूर बाजार समितीत एकूण 2688-35 क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याचे बाजारभाव नंबर 1 कांदा कमीत कमी 1200 ते जास्तीत जास्त 1800 रु . क्विंटल नंबर 2 कांदा कमीत कमी 750 ते जास्तीत जास्त 1150 /व नंबर 3 कांदा कमीत कमी 200 ते जास्तीत जास्त 700 क्विंटल तसेच गोल्टी कांद्यास कमीत कमी रु .400 ते जास्तीत जास्त 800 बाजारभाव मिळाला.
तर सोयाबीनची 19 क्विंटल आवक आली. कमीत कमी रु.5050 तर जास्तीत जास्त 5500 / – सरासरी 5250 / – बाजारभाव निघाले. गडगडलेल्या दरात किंचित सुधारणा होत असल्याचं दिसून येत आहे.
चाकण बाजारात कांद्याची विक्रमी आवक :-
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची विक्रमी आवक झाली. हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर व वांग्याची आवक घटल्याने त्यांचे भाव तेजीत राहिले आहेत. बटाट्याची आवक स्थिर राहिल्याने भावात वाढ झाली. लसणाची आवक स्थिर राहिल्याने भावात घट झाली. फळभाज्यांच्या बाजारात कोथिंबीर व पालक भाजीची भरपूर आवक झाली. जनावरांच्या बाजारात म्हैस व शेळ्या मेंढ्याची संख्या वाढल्याने भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल 3 कोटी 50 लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 1500 क्विटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 250 क्विंटलने वाढल्याने भाव स्थिर राहिले आहेत. कांद्याचा कमाल भाव 1500 रुपयांवर स्थिरावला.
बटाट्याची एकूण आवक 2750 क्विटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहिल्याने भावात 100 रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव 2200 रुपयांवरून 2,300 रुपयांवर पोहोचला.
लसणाचा कमाल भाव 5 हजार रुपयांवरून ४ हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 1200 क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला 2 हजार ते 4 हजार रुपये असा भाव मिळाला.
पेन बाजारात कांद्याला सर्वात जास्त दर :-
रायगड जिल्ह्यातील पेन कृषी उत्पन्न मार्केट यार्डमध्ये कांद्याला सर्वाधिक दर मिळाला असून लाल कांद्याची 273 क्विंटल आवक झाली असून तब्बल 3700 पर्यंत भाव मिळाला आहे.