अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत पाचपुते गटाला जोरदार धक्का बसला आहे. ज्येष्ठ भाजप नेते माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि त्यांचे पूत्र माजी मंत्री प्रतापसिंह पाचपुते यांच्या गटाचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे काष्टी ग्रामपंचातीवरील पाचपुते यांची पाठिमागील 40 वर्षे सलग सत्ता होती ती आता संपुष्ठात आली आहे.

काष्टीच्या निवडणुकीत आ.पाचपुते यांनी मुलगा प्रताप यांना सरपंचपदाची उमेदवारी दिल्याने आमदार पाचपुते यांचे बंधू स्व. सदाशिव पाचपुते यांचे चिरंजीव साजन पाचपुते यांनी घरातच बंड करत विरोधी बाजूंकडूने सरपंचपदासाठी उभे असल्याने काष्टीत ग्रामपंचायत निवडणुकीत सख्खे चुलत भाऊ आमनसामने आले होते.

या सरपंच पदाच्या निवडणुकीत साजन पाचपुते यांनी आपल्याच चुलत भावाचा म्हणजे प्रतापसिंह पाचपुते यांचा 191 मतांनी पराभव करत मोठा धक्का दिला आहे. पक्षीय बलाबल पाहिलं तर प्रतापसिंह पाचपुते गटाने 10 जागांवर विजय मिळवला असून 7 जागांवर साजन पाचपुते यांनी विजय मिळवला आहे.

आत्तापर्यंत गेली 43 वर्षे श्रीगोंदयाचे राजकारण पाचपुते भोवती फिरते ठेवले. या काळात 9 विधानसभा निवडणुका सलग पाचपुते यांनी वेगवेगळ्या चिन्हावर लढवून 7 वेळा आमदार झाले. एकदा गृहराज्यमंत्री तर, दोनदा कॅबिनेट मंत्री झाले. राज्यात असा विक्रम करणारे कोणीही नेते नाही.

परंतु आता त्यांचं वयही झालं असल्याने सततच्या आजारपणामुळे ते 2024 विधासभा निवडणूक लढवतील की नाही ? याबाबत साशंकता आहे. त्यातच आपल्याच होम ग्राउंडवर मुलाचा झालेला पराभव त्यामुळे मुलाला विधानसभेवर प्रमोट करण्याची लिटमस टेस्टही फेल झाल्याने त्यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

पहा तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीचे सर्व निकाल एका क्लिकवर..

Ahmednagar G.P Election Result

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *