Kusum Solar Pump Yojana : शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावं यासाठी कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जात आहे. या संदर्भातील एका अतिशय महत्त्व पूर्ण अपडेट हाती आलं आहे.
राज्यांमध्ये टप्पा – 2 राबवला जात असून या अंतर्गत टप्पा -1 अन् टप्पा -2 मिळून 52 हजार 750 पंपाचे इन्स्टोलेशन राज्यांमध्ये केलं जात आहे. याच योजनेपैकी साधारणपणे 46 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन देण्यात आले होते.
उर्वरित साधारणपणे 7 हजारांपेक्षा जास्त शेतकरी पेमेंट ऑप्शन येण्याच्या प्रतीक्षेत होते. याचबरोबर या योजनेचा टप्पा – 3 सुद्धा सुरु होऊन उर्वरित 50 हजार शेतकऱ्यांना मार्च 2023 पूर्वी पपं दिले जाणार असून शासनाच्या माध्यमातून धोरण निश्चित करण्यात आलं आहे.
या अनुषंगाने अर्ज केलेल्या परंतु अद्याप देखील पेमेंटचं ऑप्शन न आलेल्या शेतकऱ्यांसाठी आता त्यांच्या अर्ज भरलेल्या ठिकाणी व्हर्चुअल अकाउंट नंबर (Virtual Account Number) जनरेट करण्यात आला आहे.
ज्या लाभार्थ्यांचा व्हर्चुअल अकाउंट नंबर जनरेट केला आहे त्या लाभार्थ्यांना आता लवकरचं पेमेंट ऑप्शन येणार असून ज्या शेतकऱ्यांनी ज्या प्रवर्गासाठी व प्रकारासाठी अर्ज केला आहे त्यानुसार आवश्यक असलेली पेमेंटची रक्कम आपल्या खात्यामध्ये तयार करून ठेवावी या काही दिवसांत केव्हाही या शेतकऱ्यांसाठी लवकरच आपले पेमेंट ऑप्शन खुले करून दिली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जवळजवळ साडेसात हजार शेतकऱ्यांना या टप्प्यांमध्ये पेमेंट ऑप्शन दिलं जाईल अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आणि यापुढील प्रक्रिया संदर्भातील 50,000 पंपासंदर्भात लाभार्थ्यांना कागदपत्र अपलोड करणे बाकी आहे तसेच कागदपत्रे अपलोड केलेल्या लाभार्थ्यांना सुद्धा पेमेंट ऑप्शन बाकी आहे. या संदर्भातील येणाऱ्या काळामध्ये जे काही महत्वाचे अपडेट येतील ते जाणून घेणार आहोत. पेमेंटचं ऑप्शन आल्यानंतरसुद्धा आपण तात्काळ घेऊ.
परंतु ज्या शेतकऱ्यांच्या प्रोफाइलमध्ये पेमेंट करण्यासाठी ऑप्शन खुला झाल्यास त्याचा दिलेला कालावधी लक्षात घेऊन आपल्या अकाऊंटमध्ये पेमेंटची तजवीज व वेंटर सिलेक्शन करण्याची तयारी ठेवावी…