Take a fresh look at your lifestyle.

BREAKING : राज्यातील 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर। सरपंचदाची थेट जनतेतून निवड, आचारसंहिता लागू, पहा तालुके….

0

शेतीशिवार टीम : 12 ऑगस्ट 2022 :- ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. राज्यातील पावसाचे कमी प्रमाण असलेल्या 51 तालुक्यामधील 608 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.या 608 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाची निवड ही थेट जनतेमधून होणार आहे. त्याच्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून 12 ऑगस्त 2022 रोजी एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले असून प्रसिद्धीपत्रकात काय आहे माहिती कोणत्या तालुक्यातील किती गावे आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेउया…

पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

श्री. मदान यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या 17 मे 2022 रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 51 तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत राज्य विवडणूक आयोगास तात्काळ अहवाल स्पदर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार 18 ऑगस्ट 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे 24 ऑगस्ट 2022 ते 1 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील.

शासकीय सुट्टीमुळे 27 , 28 व 31 ऑगस्ट 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 2 सप्टेंबर 2022 रोजी होईल.

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतदान 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 19 सप्टेंबर 2022 रोजी होईल.

समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत, अशीही माहित श्री. मदान यांनी दिली.

ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या :-

नंदुरबार जिल्हा
शहादा तालुका – 74
नंदुरबार तालुका – 75

धुळे जिल्हा
शिरपूर तालुका – 33

जळगाव जिल्हा
चोपडा तालुका – 11
यावल तालुका – 2.

बुलढाणा :
जळगाव (जामोद) – 1
संग्रामपूर तालुका -1
नांदुरा तालुका- 1
चिखली तालुका- 3
लोणार तालुका – 2

अकोला जिल्हा
अकोट – 7
बाळापूर – 1.

वाशीम जिल्हा
कारंजा – 4

अमरावती जिल्हा
धारणी – 1
तिवसा – 4
अमरावती – 1
चांदुर रेल्वे – 1

यवतमाळ जिल्हा
बाभुळगाव – 2
कळंब – 2
यवतमाळ – 3
महागाव – 1
आर्णी – 4
घाटंजी – 6
केळापूर – 25.
राळेगाव – 11,
मोरेगाव – 11
झरी जामणी – 8.

नांदेड जिल्हा
माहूर- 24
किनवट- 47
अर्धापूर- 1
मुदखेड – 3
नायगाव (खेरगाव) – 4
लोहा – 5
कंधार – 4
मुखेड – 5
देगलूर – 1

हिंगोली जिल्हा
औंढा नागनाथ – 6.

परभणी जिल्हा
जिंतूर – 1
पालम – 4

नाशिक जिल्हा
कळवण- 22
दिंडोरी- 50
नाशिक – 17

पुणे जिल्हा
जुन्नर – 38
आंबेगाव – 18
खेड- 5
भोर- 2

अहमदनगर जिल्हा
अकोले- 45.

लातूर जिल्हा
अहमदपूर – 1

सातारा जिल्हा
वाई – 1
सातारा – 8

कोल्हापूर जिल्हा
कागल – 1

Leave A Reply

Your email address will not be published.