शेतीशिवार टीम : 13 ऑगस्ट 2022 :- देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ने आता त्यांची सर्वात लोकप्रिय हॅचबॅक कार स्विफ्ट सीएनजी व्हर्जनमध्ये लॉन्च केली आहे. आणि यासोबतच ही देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार बनली आहे. चला जाणून घेऊया नवीन स्विफ्ट S-CNG ची किंमत आणि मायलेज…
इंजिन आणि मायलेज :-
मारुती स्विफ्ट S-CNG मध्ये 1.2L K-सिरीज ड्युअल जेट, ड्युअल VVT इंजिन आहे जे 77.49PS पॉवर आणि 98.5Nm टॉर्क निर्माण करते. यात 5 स्पीड गिअरबॉक्सची सुविधा आहे. ही कार 30.90Km मायलेज देत आहे आणि यासह स्विफ्ट एस – सीएनजी देशातील सर्वात जास्त इंधन कार्यक्षम प्रीमियम हॅचबॅक कार तसेच सर्वात शक्तिशाली कार बनली आहे.
मारुती स्विफ्ट S-CNG किंमत :-
मारुती स्विफ्ट S-CNG Vxi : रु 7.77 लाख (Ex-showroom)
मारुती स्विफ्ट S-CNG Zxi : रु 8.45 लाख (Ex-showroom)
मारुती स्विफ्ट S-CNG डायमेंशन :-
लांबी : 3845 mm
उंची : 1530 mm
रुंदी : 1735 mm
व्हीलबेस : 2450 mm
मारुती स्विफ्ट S-CNG च्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही त्याच्या विभागातील सर्वात स्पोर्टी आणि सर्वात प्रशस्त कार आहे. लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत 26 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. स्विफ्टची कामगिरी खूप चांगली मानली जाते, त्यातील इंजिन शहरात आणि महामार्गावर चांगले कार्य करते.
कारमध्ये फिचर्सची कमतरता नाही. याला चांगला स्पेस मिळतो, सुरक्षेसाठी अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, ईबीडी, एअरबॅग्ज, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, रिअर कॅमेरा, हिल होल्ड असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल सारखे फीचर्स कारमध्ये देण्यात आली आहेत.
मारुती सुझुकीने यावर्षी नवीन Celerio CNG आणि Dzire CNG लाँच केला आहे, ज्यांची किंमत अनुक्रमे 6.58 लाख आणि 8.14 लाख रुपये आहे. ब्रेझा आणि काही नेक्सा रेंजच्या कारसाठीही CNG ऑप्शन सादर करण्याची योजना आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता CNG महाग होत असली तरीही CNG वाहने खूप स्वस्त आहेत. अलीकडे CNG आणि पेट्रोलच्या किमतीतील तफावत कमी झाली आहे…