मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं.
रेणू शर्मांनी तक्रार मागे घेतल्याने विविध तर्क-वितर्क लढवले जातायत. अशातच धनंजय मुंडे यांनी तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्यानेच त्यांनी तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षआ उमा खापरे यांनी केला आहे.
“मी रेणू शर्मा यांना दोनदा भेटलो आहे. रेणू मला वारंवार संपर्क करुन रिलेशनशिपबाबत विचार असत” असा आरोप कृष्णा हेगडे यांनी केला होता. कोणा महिलेला बदनाम करुन मला काही मिळणार नाही, मात्र दोन तीन जणांशी ती असं वागली आहे.
म्हणून आता तक्रार नोंदवली. माझ्यासाठी हा राजकीय मुद्दा नाही. धनंजय मुंडे यांना मी ओळखतही नाही” असं कृष्णा हेगडेंनी स्पष्ट केलं होतं.
गेल्या दोन आठवड्यांपासून धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. स्वत: फेसबुक पोस्ट करुन धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या बहिणीशी सहसंबंधाचा खुलास केला होता.
मात्र पैशांच्या कारणास्तव मला करुणा यांच्या बहिण रेणू यांच्याकडून ब्लॅकमेल केलं जातंय, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी रेणू यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.
रेणू शर्मा यांच्या आरोपानुसार जर तक्रार दाखल झाली असती तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती. मागील पंधरा दिवसांत मुंडे आरोपांनी घायाळ झाले होते. मात्र आता संबंधित तरुणीने तक्रार मागे घेतल्याने त्यांना या प्रकरणी मोठा दिलासा म्हणावा लागेल.
“मी रेणू शर्मा यांना दोनदा भेटलो आहे. रेणू मला वारंवार संपर्क करुन रिलेशनशिपबाबत विचार असत” असा आरोप कृष्णा हेगडे यांनी केला होता.
कोणा महिलेला बदनाम करुन मला काही मिळणार नाही, मात्र दोन तीन जणांशी ती असं वागली आहे. म्हणून आता तक्रार नोंदवली. माझ्यासाठी हा राजकीय मुद्दा नाही. धनंजय मुंडे यांना मी ओळखतही नाही” असं कृष्णा हेगडेंनी स्पष्ट केलं होतं.
- PM Awas Gramin List 2025 : घराचे स्वप्न साकार होण्यासाठी 15 जून अखेरची संधी ; आवास प्लस 2024 मोबाईल ॲपद्वारे अशी करा नोंदणी .
- MHADA Konkan Lottery 2025 : जुलैमध्ये 4000 घरांसाठी लॉटरी! ठाणे – कल्याणमध्ये 1 BHK फ्लॅट फक्त 17 लाखांपासून पुढे..
- महाराष्ट्र हवामान अपडेट ! राज्यातील 12 जिल्ह्यांना अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती..
- जिल्हाधिकाऱ्यांचा दणका ! जिल्ह्यातील तब्बल 75 ग्रामपंचायत सदस्य अपात्र ; इतर सदस्यही रडारवर..
- Surat-Chennai expressway : महामार्गाच्या कामाला अक्कलकोटमधून सुरुवात ! पहा, नगर-बीड-धाराशिव-सोलापूरातील ‘या’ गावांतून जाणार महामार्ग..