Take a fresh look at your lifestyle.

सकाळ – संध्याकाळ गायब होणार हे एक असं मंदिर ; IAS इंटरव्हिव्ह ला विचारला होता याबाबत प्रश्न..

0

शेतीशिवार टीम, 22 फेब्रुवारी 2022 : भारतात अशी अनेक मंदिरे आहेत, जी जगभरात प्रसिद्ध आहेत. या मंदिरांच्या दर्शनासाठी दूरवरून लोक येतात. भगवान शंकराची अशी अनेक प्राचीन मंदिरे आहेत जी खूप प्रसिद्ध आहेत. त्यापैकी गुजरातमधील ‘स्तंभेश्वर महादेव’ मंदिराचाही उल्लेख आहे. हे सर्वात जुने मंदिर असल्याने, स्तंभेश्वर महादेव मंदिराला ‘गायब मंदिर’ असेही म्हटलं जातं. श्रावण महिन्यात या मंदिरात लोकांची गर्दी असते. महादेवाच्या दर्शनासाठी दूरदूरवरून लोक येतात.

‘स्तंभेश्वर महादेव’ मंदिर भगवान शिवपुत्र कार्तिकेयाने त्याच्या तपोबलाने बांधलं होतं. समुद्रात वसलेलं हे मंदिर दिवसातून दोनदा गायब होतं. मंदिर गायब होणे हा अनेकांना चमत्कार वाटतो. इतकेच नाही तर लोक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी या मंदिरात येत असतात. तुम्हीही भगवान शंकराचे भक्त असाल तर तुम्ही या मंदिराला भेट देण्यासाठी जाऊ शकता…

या मंदिराला ‘गायब मंदिर’ असं का म्हटलं जातं… 

दररोज सकाळी आणि संध्याकाळी ‘स्तंभेश्वर महादेव मंदिर’ काही काळासाठी गायब होतं. यामागे एक नैसर्गिक कारण आहे, खरं तर दिवसभर समुद्राची पातळी इतकी वाढते की, मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जातं.

मग काही क्षणात समुद्राची पातळी कमी होते आणि नंतर मंदिर पुन्हा दिसू लागतं. असं नेहमी सकाळी आणि संध्याकाळी घडतं. मंदिर गायब होण्यामागचं कारण समुद्राद्वारे शिवचा अभिषेक असल्याचं मानलं जातं. एवढेच नाही तर या शिवमंदिराचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरवरून भाविक येतात

असं सांगितलं जातं की, सुमारे दीडशे वर्षांपूर्वी या मंदिराचा शोध लागला असून या मंदिरातील शिवलिंगाची उंची 4 फूट आणि व्यास 2 फूट आहे.

‘स्तंभेश्वर महादेव’ मंदिराला तुम्ही भेट कशी द्याल…

स्तंभेश्वर महादेव मंदिर गुजरातमधिल वडोदरा येथुन सुमारे 40 किमी अंतरावर जंबुसर तहसीलमध्ये आहे.कावी कंबोई हे गुजरात मधले वडोदरा पासून सुमारे 75 किलोमीटर अंतरावर आलं.

कावी कंबोई हे वडोदरा, भरुच आणि भावनगर सारख्या रस्त्याने जोडलं आहे. वडोदरा येथुन तुम्ही स्तंभेश्वर महादेव मंदिरात खाजगी टॅक्सी किंवा इतर वाहनाने जाऊ शकता. त्याचबरोबर मंदिराशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही www.stambheshwarmahadev.com ला भट देउ शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.