शेतीशिवार टीम, 23 फेब्रुवारी 2022 : UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.
खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये अन् परीक्षेमध्ये खूप मदत करू शकतात.
प्रश्न : जगातील सर्वात मोठा चित्रपट निर्माता देश कोणता आहे ?
उत्तर : भारत हा जगातील सर्वात मोठा चित्रपट निर्माता आहे.
प्रश्न : भारतात प्रथमच IAS परीक्षा कधी घेण्यात आली?
उत्तर : भारतात प्रथमच 1950 मध्ये IAS परीक्षा घेण्यात आली. राज्यघटनेच्या कलम 315 ते 322 मध्ये प्रशासकीय सेवांचा तपशील देण्यात आला आहे.
प्रश्न : दोनदा उपराष्ट्रपती आणि एकदा राष्ट्रपती झालेल्या व्यक्तीचे नाव काय ?
उत्तर : डॉ. एस. राधाकृष्णन.
प्रश्न : भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण होती ?
उत्तर : इंदिरा गांधी.
प्रश्न : जगातील सर्वात मोठी शाळा कोणती आहे ?
उत्तर : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या नवीन आवृत्तीनुसार, जगातील सर्वात मोठी शाळा म्हणजे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील सिटी मॉन्टेसरी स्कूल (CMS) शाळा आहे. 2013 मध्ये, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सने याला जगातील सर्वात मोठी शाळा म्हणून प्रमाणित केलं आहे.
मुलांच्या संख्येच्या दृष्टीने ही शाळा सर्वात मोठी आहे. या शाळेत जवळपास 55 हजार मुले शिकतात. तसेच या शाळेत 4500 लोकसंख्या आहे. या शाळेचे लखनऊ शहरातच 18 कॅम्पस आहेत.
प्रश्न : जगातील सर्वात मोठं रोड – नेटवर्क कोठे आहे ?
उत्तर : जगातील सर्वात मोठे रोड-नेटवर्क भारतात आहे, भारतामध्ये 47 लाख किमी लांबीचे जगातील सर्वात मोठे रस्ते नेटवर्क आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग (NH), द्रुतगती मार्ग, राज्य महामार्ग (SH), जिल्हा रस्ते, PWD रस्ते आणि प्रकल्प रस्ते यांचा समावेश आहे.
प्रश्न : भारतातील पहिली किन्नर डॉक्टर कोण आहेत ?
उत्तर : डॉ. प्रिया केरळ आणि भारतातील पहिल्या किन्नर डॉक्टर आहेत.
प्रश्न : जगात सर्वाधिक दूध उत्पादन कुठे होतं?
उत्तर : भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे.
प्रश्न : जगात सर्वाधिक आंबा उत्पादन कुठे होतं?
उत्तर : भारतात दरवर्षी 1.2 दशलक्ष टन आंब्याचं उत्पादन होतं.
प्रश्न : भारताची पहिली महिला शासक कोण होती?
उत्तर : रझिया सुल्तान
प्रश्न : जगातील सर्वात मोठे वटवृक्ष कोठे आहे?
उत्तर : जगातील सर्वात मोठे वटवृक्ष हावडा, पश्चिम बंगाल येथे आहे. हे (The Great Banyan Tree) म्हणून ओळखलं जातं. हे महाकाय वटवृक्ष 250 वर्षांहून अधिक जुनं आहे. हा जगातील सर्वात मोठा वटवृक्ष भारतातील कोलकाता येथील आचार्य जगदीश चंद्र बोस बोटॅनिकल गार्डनमध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या झाडाची स्थापना 1787 मध्ये झाली होती.
प्रश्न : कोणत्या देशात सर्वाधिक मशिदी आहेत ?
उत्तर : भारत असा देश आहे, जिथे सगळ्यात जास्त म्हणजे सुमारे 300,000 मशिदी आहेत.
प्रश्न : UPSC ची स्थापना कधी झाली? आणि त्याचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर : UPSC ची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 रोजी झाली. याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. आणि प्रदीपकुमार जोशी (Pradeep Kumar Joshi) हे त्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत.
प्रश्न : असा कोणतं देश आहे, त्याच्या 3 राजधान्या आहेत ?
उत्तर : दक्षिण आफ्रिका असा एक देश आहे त्याच्या एक नाही तर तीन राजधान्या आहे. प्रिटोरिया (Pretoria) , ब्लोमफॉन्टेन (Bloemfontein) आणि केप टाउन (Cape Town) या त्याच्या राजधानी आहेत.
प्रश्न : अवघ्या दहा दिवसांत कोणत्या देशाचे पाच वेगवेगळे राष्ट्रपती झाले ?
उत्तर : “अर्जेंटिना” (Argentina) हा असा देश आहे, जिथे 2001 मध्ये, दहा दिवसांत, पाच वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांची निवड झाली होती.
प्रश्न : जगातील सर्वात उंच झाड कोणतं आणि ते कुठे आढळलं ?
उत्तर : कॅलिफोर्नियामधील रेडवुड (Redwood) नॅशनल पार्कमध्ये उभे असलेले कोस्ट रेडवुड हे जगातील सर्वात उंच जिवंत वृक्ष आहे, उंची 115.66 मीटर उंच म्हणजेच 379 फुटांचं हे झाड आहे. हे वृक्ष कुतुबमिनार पेक्षाही उंच आहे.
प्रश्न : जगातील सर्वात मोठा रेल्वे बोगदा कुठं आहे ?
उत्तर : स्वित्झर्लंड (Switzerland) गॉटहार्ड बेस बोगदा, (Gotthard Base Tunnel) त्याची लांबी आज 57.09 km आहे. हा जगातील सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे.