शेतीशिवार टीम, 24 फेब्रुवारी 2022 : 23 Ft. Long Sugarcane Farming : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील बिलारी भागात एका शेतकऱ्याने चमत्कार घडवला आहे. मोहम्मद मोबीन नावाच्या शेतकऱ्याने 23 फुटांपेक्षा जास्त उंचीचा ऊस उत्पादन करून नवा विक्रम केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचा ऊस जिल्हाभर चर्चेचा विषय बनला असून सगळेजण त्याच्या शेतात जाऊन पाहणी करू लागले आहे.
खास खंदकाच्या (ट्रेंच विधि (Trench Method ) पद्धतीने घेतलेलं पीक पाहण्यासाठी दूरदूरवरून ऊस उत्पादक शेतकरी मोबीनच्या शेतात जाऊन उसाबाबत माहिती घेत आहे.
शेतकऱ्याच्या या खास तंत्रामुळे उसाचे उत्पन्न दुप्पट, तर उत्पन्नात ही तिपटीने वाढ झाली आहे. उसासोबतच तो कोबी आणि बटाटा पिकांचीही पेरणी करत आहे.
उसाच्या पट्ट्यात आपला ठसा उमटवणाऱ्या पश्चिम उत्तर प्रदेशातील मोहम्मद मोबीन या शेतकऱ्याने असे काही करून दाखवलं आहे, ज्यामुळे तो आज चांगल्या शेतीमुळे चर्चेत आला आहे.
23 फूट उंच उसाच्या वाढीमुळे त्याचे उत्पन्नही तिप्पट झालं. बिलारी भागातील थनवाला येथे राहणाऱ्या मोहम्मद मोबीनने काहीतरी वेगळे करण्याची आवड असल्याने हे यश मिळवले आहे.

त्यांनी खंदक पद्धतीने उसाचे पीक घेण्यास सुरुवात केली. जेव्हा त्यांच्या शेतात उभा असलेला ऊस 23 फुटांपेक्षा जास्त उंच झाला तेव्हा त्यांच्या पुढाकाराला यश आले. त्यांचे वजनही तुलनेने सामान्य उसापेक्षा दुप्पट होते.
पूर्वी एक बिघा शेतात 40-50 क्विंटल ऊस उपलब्ध होता, तेव्हा मोहम्मद मोबीनच्या खंदक पद्धतीमुळे एका बिघा शेतात 100 क्विंटलपेक्षा जास्त पीक आले आहे. मोबीन यांनी देशभरातील शेतकर्यांना चांगले पीक घेण्यासाठी अवलंबलेल्या पद्धतीनुसार पिके घेण्यास सुरुवात करण्याचं आवाहन केलं आहे.