Holi Special Train : होळीनिमित्त मुंबई, पुणे, दौंडमधून विशेष गाड्या, ‘या’ स्टेशनवर असणार थांबे; पहा संपूर्ण टाइम टेबल..
मध्य रेल्वेने होळीच्या सणाला गावी जाणाऱ्या प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पुणे – वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन या मार्गावर 32 तर दौंड – अजमेर या मार्गावर एकूण 8 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे होळीसाठी गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी मोठा दिलासा रेल्वे विभागाने दिला आहे.
पुणे – वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन या मार्गांवर एकूण 32 फेच्या करण्यात येणार आहे. यामध्ये पुणे – वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन (ट्रेन 01921 ) ही साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस गाडी पुण्याहून 14 मार्च ते 27 जून या कालावधीत दर गुरुवारी दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी सुटणार आहे.
तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शनला पोहोचणार आहे. तर वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन – पुणे (ट्रेन 01922 ) ही साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस गाडी दर बुधवारी (13 मार्च ते 26 जूनपर्यंत) वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन येथून दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी सुटणार आहे.
तर दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी पुण्याला पोहोचणार आहे. या गाडीला दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, नर्मदापूरम, भोपाळ, विदिशा, बीना आणि ललितपुर या स्टेशनवर थांबे असणार आहे.
दौंड – अजमेर या मार्गावर एकूण 8 फेल्या करण्यात येणार आहे. यामध्ये दौंड – अजमेर (ट्रेन 09626) ही साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस गाडी 15 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत दर शुक्रवारी रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी दौंडहून सुटणार आहे. तर दुसऱ्या दिवशी रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी अजमेरला पोहोचणार आहे.
अजमेर – दौंड (ट्रेन 09625) ही साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस गाडी 14 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत दर गुरुवारी अजमेरहून सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी सुटणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी दौंडला पोहोचणार आहे.
या गाडीला पुणे, लोणावळा, पनवेल, वसई रोड, बोईसर, वापी, वलसाड, सुरत, भरूच, वडोदरा, गोध्रा, दाहोद, रतलाम, नागदा, भवानी मंडी, रामगंजमंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर, किशनगड आणि मदार जंक्शन या स्टेशनवर थांबे असणार आहे..
वांद्रे टर्मिनस – V लक्ष्मीबाई जेएचएस सुपरफास्ट स्टेशनचे वेळापत्रक..
वांद्रे टर्मिनस – व्ही लक्ष्मीबाई जेएचएस सुपरफास्ट एक्स्प्रेस 9 मार्च 2024 ते 30 मार्च 2024 पर्यंत आठवड्यातून एकदा धावणार असून या ट्रेनच्या एकूण 4 फेऱ्या असणार आहे. वांद्रे टर्मिनस स्थानकातून शनिवारी पहाटे 5.10 वाजता गाडी क्रमांक 02200 सुटेल. रविवारी पहाटे 5 वाजता जेएचएस स्थानकावर पोहोचेल.
मार्गात ही गाडी बोरेवली, वापी – सुरत, भरूच जंक्शन, वडोदरा जंक्शन, गोधरा जंक्शन, दाहोद, रतलाम जंक्शन, नागदा जंक्शन, उज्जैन जंक्शन, माकसी, भैयवारा राजगड, रुथियाई, गुना, शिवपुरी, डबरा, दतिया स्टेशनवर थांबणार आहे.