Take a fresh look at your lifestyle.

‘लाडकी लेक’ बनणार लखपती! 19 कोटी 70 लाखांचा निधी वितरित, असे असणार लाभाचे टप्पे, पहा PDF अर्ज प्रोसेस..

0

मुलींचा जन्मदर आणि तिला आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य शासनाने ‘लेक लाडकी’ योजना आणली आहे. या योजनेतून आपसूकच मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तिच्या खात्यात एक लाख रुपयांचा निधी जमा होतो. यामध्ये काही रकमेचे हप्ते निश्चित करण्यात आले आहेत.

नुकतेच राज्य शासनाने ‘लेक लाडकी’ योजनेसाठी 19 कोटी 70 लाखांचा निधी वितरित केला असून नागपूर जिल्हा परिषदेच्या तिजोरीत 50 लाखांचे अनुदान जमा झाले आहेत.

या योजनेंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षांची झाल्यानंतर एकूण एक लाख रुपये मिळणार आहेत. या योजनेंतर्गत जिल्ह्यात आजवर एक हजारांहून अधिक पालकांनी महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज सादर कले आहेत. शासनाकडून या योजनेतील पहिल्या हप्त्याची अर्थात पाच हजार रुपयांची रक्कम लवकरच मुलीच्या आई – वडिलांसह संयुक्त बँक खात्यावर वळती होणार आहे.

1 एप्रिलपासून ही योजना राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ती राबविण्यात येत असून या योजनेतील लाभाची रक्कम लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात जमा होईल. ही योजना 1 एप्रिल 2023 नंतर एक मुलगी व मुलगा आहे, त्यांनाच लागू राहणार आहे. ज्यांना एक मुलगी आहे. दोन्ही मुली आहेत, असे कुटुंबीय या योजनेस पात्र असेल.

या योजनेंतर्गत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील मुलींना शासनाकडून ही आर्थिक मदत देण्यात येणार आहे. मुलीच्या जन्मापासून त तिच्या शिक्षणापर्यंतचा सर्व खच शासनाकडून एकूण पाच हप्त्यांमध्ये उचलण्यात येणार आहे. या योजनेची ग्रामीण भागात लाभार्थ्याची पात्रता पडताळणीची जबाबदारी अंगणवाडीसेविका, संबंधित पर्यवेक्षिका, तर नागरी भागात मुख्य सेविकांची राहणार आहे..

असे राहील लाभाचे टप्पे..

या योजनेंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनधारकांना त्यांच्या कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये मिळतील.

मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार, सहावीत गेल्यावर सात हजार रुपये, 11 वीत गेल्यावर आठ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर तिला 75 हजार रुपये असे एकूण एक लाख एक हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येईल.

महाराष्ट्र ‘लेक लाडकी’ योजना

PDF फॉर्म

निघेल झिरो बॅलेन्सवर खाते.. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी झिरो बॅलेन्स खाते उघडण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. महिला व बालकल्याण विभाग आयुक्तांनी तशा आशयाचे निर्देश दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही जिल्ह्यातील बँकाना व्हीसीच्या माध्यमातून आदेश दिले आहेत.

‘लेक लाडकी’ योजनेच्या पहिल्या हप्त्यापोटी प्रतिलाभार्थी पाच हजार रुपयाप्रमाणे त्याच्या संयुक्त बैंक खात्यात वळते करण्यात येतील. विभागाकडे आजवर एक हजारापेक्षा अधिक अर्ज आले आहेत. त्यापैकी पोर्टलवर 109 अर्ज अपलोडिंगचे काम पूर्ण झाले. काहींमध्ये त्रुटी आहेत. त्यांना तातडीने त्रुटींची पूर्तता करण्याच्या सूचना आहे .

– दामोधर कुंभरे, डेप्युटी सीईओ, महिला व बालकल्याण विभाग, जि.प. नागपूर

Leave A Reply

Your email address will not be published.