नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शासनाकडून संपादित करावयाच्या जमिनीच्या सीमांकनाला अंतिम मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने राजपत्रही जारी केले आहे. वर्धा जिल्ह्यातील डिग्रज गावातून हा मार्ग सुरू होणार आहे. नागपूर -मुंबई समृद्धी महामार्गानंतर आता वर्धा – गोवा रस्ता तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे..
वर्धा ते सिंधुदुर्गातील बांदा असा 802 किमीचा हा मार्ग असणार आहे. या मार्गावर माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर अशी तीन शक्तीपीठे असल्यामुळे या मार्गाला शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. राज्य सरकारने मार्च 2023 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर 7 मार्च रोजी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेले राजपत्र जाहीर केले आहे. त्यामुळे आता भूसंपादनाच्या प्रक्रियेलाही वेग येणार आहे.
हा मार्ग वर्धा जिल्ह्यातील दोन तालुक्यांतील 20 गावातून जाणार..
सरकारी अधिसूचनेनुसार, हा मार्ग समृद्धी मार्गाशी जोडूनच तयार केला जाणार आहे. यापूर्वी पवनार येथून हा मार्ग सुरू होणार होता मात्र तांत्रिक कारणामुळे वर्धा शहरापासून सहा किमी अंतरावर असलेल्या येलाकेली इंटरचेंजपासून तीन किमीनंतर हा मार्ग डिग्रज गावाजवळ वळणार आहे.
त्यानंतर देवळी, खर्डा मार्गे यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर पोहोचेल. रस्त्यासाठी वर्धा तालुक्यातील सात आणि देवळी तालुक्यातील 13 गावांच्या जमिनी संपादित करायच्या आहेत. ज्यामध्ये देवळी शहरालगतची जमीनही संपादित केली जाणार आहे. त्यात वर्धा तहसील डिग्रज, पांढरकवडा, गणेशपूर, झारगाव, तिगाव, रोठा, धोत्रा रेल्वे आणि देवळी तालुक्यातील निमगाव, पडेगाव, चिकणी, देवळी, इसापूर, काजलसरा, वाटखेडा, बाभूळगाव, सैदापूर, करमळापूर, वाबगांव, काशीमपुर या गावांचा समावेश आहे. वर्धा नदी ओलांडल्यानंतर कळंब तालुक्यातील वंदली गावातून हा मार्ग पुढे जाईल.
हा मार्ग या जिल्ह्यांतील तालुक्यांमधून जाणार आहे..
शक्तीपीठ मार्ग कळंब, यवतमाळ, घाटंजी, आर्णी, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव, उमरखेड, नांदेड जिल्ह्यातील हातगाव, कानमानुरी, अर्धापूर, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, पूर्णा, परभणी, परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, बीड जिल्ह्यातील परळी, अंबेजोगाई, लातूर जिल्ह्यातील रेनापुर, लातुर, औसा,
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, आटपाडी, सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ, तासगाव, मिरज, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, भुदरगड, आजरा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या बांदापर्यंत जमीन संपादित केली जाणार आहे..
या मार्गावर 83,600 कोटी रुपये होणार खर्च..
वर्धा ते बांदा या मार्गावर एकूण 83 हजार 600 रुपये खर्च येणार आहे. हा रस्ता एमएसआरडीसी बांधणार आहे. सरकारने 2028 – 29 पर्यंत मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने येत्या काही दिवसांत या मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. समृद्धी महामार्गानंतर जिल्ह्याला शक्तीपीठ मार्गाची आणखी एक भेट मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा मुंबईसह पुणे, कोकण आणि गोव्याशी संपर्क वाढल्याने रोजगार आणि उद्योगाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत..
कोणत्या तालुक्यात कोणते भूूसंंपाादन अधिकारी, पहा डिटेल्स..
शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या तालुकानिहाय गावांची यादी आली
इथे क्लिक करा
काय आहे गणित..
नागपूर ते मुंबई म्हणजेच महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सध्या चर्चेत आहे. आता नागपूर – पुणे हे अंतर कमी करण्यासाठी पुणे ते छत्रपती संभाजीनगर असा नवा मार्ग तयार करण्यात येणार असून त्याचा केंद्र – राज्य शासनातर्फे करार झाला आहे.
पुणे ते छत्रपती संभाजीनगर ऍक्सेस कंट्रोल ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे बांधला जाईल आणि छत्रपती संभाजीनगर जवळील समृद्धी महामार्गशी जोडला जाईल. या महामार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अडीच तासात तर पुढे समृद्धी महामार्गाने नागपूर ते औरंगाबाद असा साडेपाच तासात प्रवास करणे शक्य होणार आहे.