पंजाबराव डख यांचा मोठा दावा : राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट, ‘या’ जिल्ह्यांत 3-4 दिवस जोरदार पावसाचा इशारा..

0

या दिवसात सूर्य आग ओकत असल्याचे दिसत आहे. वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात तापमानात मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानात बरेच चढउतार झाले आहेत. अशा परिस्थितीत, या कडक उन्हात, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

16 आणि 17 मार्च रोजी राज्यात पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ पंजाबराव डंख यांनी वर्तवली आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया काय म्हंतायत डख..

तीन-चार दिवसांत पाऊस..

पुढील काही दिवस राज्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांना आता कडक उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. आता राज्यात अनेक ठिकाणी तापमान 37 अंशांच्या वर गेले आहे. या सर्व परिस्थितीमध्ये येत्या तीन – चार दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपीट..

अशा स्थितीत यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात उष्णतेची तीव्रता अधिक राहील, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. राज्यात तीव्र उष्णता अपेक्षित आहे. गेल्या आठवड्यात पुण्यासह राज्यभरात तापमान कोरडे होते. कमाल तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ झाली आहे..

काय आहे परिस्थिती..

उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दिल्लीतही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कर्नाटक आणि उत्तर आंध्र प्रदेशात चक्रीवादळ वाऱ्याची स्थिती आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा शेतकरी या अवकाळी पावसाच्या विळख्यात अडकण्याची भीती आहे.

तापमानात वाढ

महाराष्ट्रात थंडी संपताना दिसत आहे. उष्णता वाढली आहे. विदर्भापासून कोकणापर्यंत तापमान वाढत आहे. राज्यातील बहुतांश भागात उन्हाळा आहे. कोकण किनारपट्टीबरोबरच मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही तापमानात वाढ होत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला अशीच परिस्थिती आहे. आता एप्रिल, मे आणि जूनपर्यंत काय परिस्थिती असेल, हा प्रश्न आहे. सध्या उन्हाळा आहे..

16, 17, 18, आणि 19 तारखेला वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, अकोला, कारंजा, अमरावती, अकोट, चांदूरबाजार, बुलढाणा या भागात अवकाळी पावसाची शक्यता पंजाबरावांनी वर्तवली आहे,

राज्यात रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे. अशा परिस्थितीत, अवकाळी पावसाचे आगमन झाले तर शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.