शेतीशिवार टीम, 4 डिसेंबर 2021 : पुणे जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणात उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणेनंतर आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचीही एंट्री झाली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
2 जानेवारी रोजी पुणे जिल्हा बँक संचालक मंडळातील 21 जागांसाठी मतदान होणार असून लगेचच 1 दिवसानंतर म्हणजे 4 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. बॅंकेच्या 21 पैकी सर्वाधिक 13 जागा अ वर्ग मतदारसंघात आहेत.
एक जागा ब (पणन, प्रक्रिया), क (पतसंस्था, नागरी, बॅंका), ड (उर्वरित), एससी / एसटी (SC/ST) , एनटी (NT), ओबीसी (OBC) आणि महिला यांच्यासाठी आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 29 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून मुदत 6 डिसेंबरपर्यंत आहे. अर्जांची छाननी 7 तारखेला होऊन 2 जानेवारीला मतदान होणार आहे.
शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी २१ जागांसाठी आतापर्यंत 66 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. सुमारे 132 जणांनी 432 उमेदवारी अर्ज नेले असल्याची माहिती आहे.