Take a fresh look at your lifestyle.

रेल्वे प्रवासात नेमकं किती असते पार्सल भाडे, दिल्ली ते पटना 25 KG चं बॉक्स, किती लागेल पैसे? पहा चार्ट, बुकींग प्रोसेस अन् चार्ज..

0

भारतीय रेल्वे ही प्रवासी वाहतुक व मालवाहतुकीसाठीचं सर्वात मोठे साधन आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, रेल्वेला मालवाहतुकीतून सर्वाधिक उत्पन्न मिळते. कारण, रेल्वे दररोज मोठ्या प्रमाणात मालगाड्या आणि इतर पार्सल गाड्यांमधून मालाची वाहतूक करत असते.

ट्रेनने प्रवास करणार्‍या प्रवाशांना बुकिंग प्रोसेस आणि भाडे याबद्दल संपूर्ण माहिती असते, परंतु लोकांना पार्सल बुक करण्याची प्रोसेस आणि शुल्क याबद्दल फारच कमी माहिती असते. चला तर मंग रेल्वेमध्ये पार्सल बुक करण्याची प्रोसेस नेमकी आहे तरी कशी ?

रेल्वेमध्ये कसे बुक केले जाते पार्सल ?

ट्रेनद्वारे पार्सल ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही बुक केले जाऊ शकते. भारतीय रेल्वे वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या पार्सल सेवा पुरवते. तुम्ही ट्रेनमधून बाइक किंवा इतर जड घरगुती वस्तू बुक करू शकता. यासाठी तुम्ही रेल्वे स्टेशनवर असलेल्या पार्सल काउंटरवर आणि https://parcel.indianrail.gov.in वर जाऊन बुकिंग करू शकता..

किलोमीटर आणि वजनानुसार किती असते भाडं..

मालवाहतूक करताना, रेल्वे पार्सलच्या अंतर आणि वजनानुसार भाडे आकारते. किलोमीटर आणि पार्सलच्या वजनानुसार भाडे दरासंबंधीचा रेल्वे चार्ट वेबसाइटवर उपलब्ध आहे. समजा तुम्हाला पटना ते दिल्ली या ट्रेनमध्ये 25 किलो वजनाचे सामान बुक करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला 320 रुपये भाडे द्यावे लागते. वास्तविक, रेल्वेच्या पार्सल चार्टनुसार, 1051 ते 1075 किलोमीटर अंतरासाठी 50 किलो वजनाच्या पार्सलचे भाडे हे फक्त 320.16 रुपये आहे. खाली दिलेला चार्ट पहा..

 

तर, मालाचे वजन 1 क्विंटलपर्यंत असल्यास पार्सल शुल्क 533 रुपये पडते. मात्र, रेल्वेने ठरवून दिलेले इतर शुल्कही त्यात जोडले जाऊ शकते. रेल्वे पार्सल काउंटरवर याबबाबतची सर्व माहिती मिळेल.

बुकिंग प्रोसेस..

रेल्वेमध्ये पार्सल बुक करण्यासाठी, तुम्हाला तुमचे सामान पार्सल कार्यालयात घेऊन जावे लागेल. यानंतर फॉरवर्डिंग लेटर भरल्यानंतर फी जमा करावी लागेल. विशेष म्हणजे ट्रेन सुटण्याच्या अर्धा तास आधीही पार्सल बुक करता येऊ शकतं. बाईक किंवा इतर लहान वाहन बुक करण्यासाठी, वाहन नोंदणी कागदपत्रे आणि सरकारी ओळखपत्र अनिवार्य आहे. याशिवाय वाहनाची पेट्रोल टाकी पूर्णपणे रिकामी असावी अशी अट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.