यंदा महाराष्ट्रात पावसाळ्यातजून ते सप्टेंबर पुरेसा पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यातील सुमारे 12 जिल्ह्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी तर 15 जिल्ह्यांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. दोन हजारांहून अधिक गावे पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अजूनही अवलंबून असून परिस्थिती चिंताजनक बनली होती.
पावसाअभावी समस्या समजून घेण्यासाठी शासनाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेतला आणि आज सर्वात मोठा निर्णय घेऊन राज्यातील तब्बल 40 तालुक्यांत दुष्कर जाहीर केला आहे, दुष्काळ जाहीर झालेल्या जिल्ह्यांची यादी आपण खाली पाहणार आहोत..
दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 नुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मुल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे . संदर्भाधीन शासन निर्णय व दुष्काळ व्यवस्थापन संहितेमध्ये विहित केलेल्या निकषानुसार खरीप 2023 च्या हंगामातील परिस्थितीच्या आधारे राज्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाची दुसरी कळ लागू झाली.
दुष्काळाची दुसरी कळ लागू झालेल्या 43 तालुक्यांपैकी उल्हासनगर या तालुक्यात पेरणीचे क्षेत्र निरंक असल्याने सदर तालुक्यात दुष्काळ घोषित करण्याचा प्रश्न उदभवत नाही. उर्वरित 42 तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पिकांचे नुकसानीचे सर्वेक्षण (Ground Truthing) करण्यात आले असून त्या आधारे राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार राज्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पीकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेवून राज्य शासन याशासननिर्णया सोबतच्या परिशिष्ट “अ” मध्ये दर्शविल्यानुसार 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यामध्ये गंभीर तर १६ तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करीत आहे..
या 15 जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर, पहा नावे..
जालना
छत्रपती संभाजीनगर
पुणे
नाशिक
बीड
लातूर
धाराशिव
सोलापूर
कोल्हापूर
सांगली
सातारा
नंदुरबार
धुळे
जळगाव
बुलढाणा
शासन निर्णय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा
तालुकानिहाय दुष्काळी जिल्ह्यांची यादी खाली पहा..