Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना : 2022

0

शेतीशिवार टीम, 12 फेब्रुवारी 2022 : महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बेरोजगार भत्ता सुरू केला आहे. या योजनेंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र सरकारकडून दरमहा 5000 रुपये बेरोजगार भत्ता दिला जाणार आहे. (Unemployment allowance of Rs 5000 per month by Maharashtra government to educated unemployed youth) आर्थिक साहाय्य म्हणून ही रक्कम प्रदान करण्यात येणार आहे.

बेरोजगार भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना स्वतःची आणि कौटुंबिक खर्चासाठी हातभार लागणार आहे. या रकमेतून बेरोजगार तरुणांना शहरांमधील नोकऱ्या शोधण्यासही मदत होणार आहे…

बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र :-

यासोबतच महाविकास आघाडी सरकारने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप आणि केजी ते पदवीपर्यंत मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे. तसेच कामगारांना 21000 रुपये किमान वेतन देण्याची घोषणा ही केली आहे.

या बेरोजगार भत्ता योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अर्जदारांनी किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. राज्यातील इच्छुक लाभार्थी ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल. या महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता अंतर्गत, सरकारकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा 5000 रुपये थेट ट्रान्सफर करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदाराचे बँक खाते असणे बंधनकारक असून बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.

बेरोजगार भत्ता योजनेचे उद्दिष्ट :-

तुम्हाला तर माहीतच आहे, राज्यात असे अनेक तरुण आहेत ज्यांचं 12वी ते पदवीपर्यंत शिक्षण होऊनही रोजगार मिळत नाही. त्यामुळे अनेक तरुण बेरोजगार आहेत, या सर्व समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने बेरोजगार भत्ता योजना महाराष्ट्र (Unemployment Allowance Scheme Maharashtra) सुरू केली आहे.

या योजनेंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुणांना राज्य सरकारकडून दरमहा बेरोजगार भत्ता दिला जाणार आहे. युवकांना रोजगार मिळेपर्यंत हा बेरोजगार भत्ता दिला जाईल. या आर्थिक मदतीतून महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करणे हा यामागचा उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांचे जीवनमान बदलणार आहे. हा पैसा तरुणांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी वापरता येऊ शकतो.

बेरोजगार भत्ता योजनेचे लाभ :-

राज्यातील सर्व बेरोजगार तरुणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र सरकारकडून दरमहा 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
बेरोजगार भत्ता योजनेंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरी मिळेपर्यंत बेरोजगारी भत्ता दिला जाईल.
बेरोजगार भत्ता ठराविक कालावधीसाठी देय असेल.
हा पैसा तरुणांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी वापरता येईल.
या योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्जदार किमान 12वी उत्तीर्ण असावा.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्त्यासाठी पात्रता :-

अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
या योजनेंतर्गत, अर्जदार सरकारी आणि निमसरकारी नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित नसावा.
अर्जदाराकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसावा.
अर्जदाराचे वय 21 ते 35 वर्षे दरम्यान असावे.
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
ग्रॅज्युएशन झालं असलं तरी कोणत्याही व्यावसायिक किंवाजॉब ऑरीएंटेड कोर्स मध्ये डिग्री नसावी.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेची कागदपत्रे :-

अर्जदाराचे आधार कार्ड
ओळखपत्र
रहिवासी दाखला
वय प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (मार्कशीट)
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो

महाराष्ट्र बेरोजगरी भत्त्यासाठी अर्ज कसा कराल ?

राज्यातील इच्छुक लाभार्थी ज्यांना सरकारकडून बेरोजगारी भत्ता मिळवायचा आहे, त्यांनी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्यात.

सर्वप्रथम, अर्जदाराला official website वर जावे लागेल. अधिकृत वेबसाइटवर गेल्यानंतर, तुमच्यासमोर होमपेज उघडेल.

या होम पेजवर तुम्हाला ”Jobseeker” हा पर्याय दिसेल. तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर लॉगिन फॉर्म (Login form) तुमच्या समोर ओपन होईल. या लॉगिन फॉर्मच्या तळाशी Register चा ऑप्शन दिसेल. तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर, रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्या समोर पुढील पेजवर उघडेल. तुम्हाला या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक इत्यादी भरावी लागेल.

सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला खालील नेक्स्ट (Next) बटणावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तुम्हाला हा OTP भरावा लागेल. आणि त्यानंतर सबमिट (Submitted) बटणावर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला लॉगिन (Login) करण्यासाठी मागील पेजवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला लॉगिन फॉर्ममध्ये युजरनेम (Username) आणि पासवर्ड (Password) आणि कॅप्चा कोड (CAPTCHA code) टाकावा लागेल आणि लॉगिन (Login) बटणावर क्लिक करावे लागेल.अशा प्रकारे तुमचा अर्ज पूर्ण होईल.

अहमदनगर जिल्हा बुकलेट वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.