शेतीशिवार टीम, 12 फेब्रुवारी 2022 : मारुती सुझुकी आपल्या नवीन बलेनोमध्ये प्रथमच असे धमाकेदार फीचर घेऊन आली आहे. जे एक अद्भुत अनुभव देनार सुद्धा आहे.मारुती सुझुकीने याचा टीचर लाँच केले आहेत. हि कार 23 फेब्रुवारीला मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे.
पहिल्यांदाच येतोय हेडअप डिस्प्ले :-
मारुती सुझुकी नवीन बलेनो (Maruti Baleno Facelift) मध्यभागी हेड-अप डिस्प्ले दिला आहे. हा एक डिस्प्ले असा आहे, ज्यामध्ये तुम्ही गाडी चालवताना तुमच्या फ्रंट ग्लास वर तुम्ही स्पीडोमीटर इमेज पाहू शकाल…
9 – इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम :-
नवीन बलेनो कार मध्ये फुल एलईडी हेडलैंप्स सह एलईडी डीआरएल,क्रोम फिनिश तसेच नवीन ग्रिल आणि एलईडी फॉग लाइट्स. तसेच 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देखील दिलेली आहे.
न्यू सेफ्टी फीचर्स ने सुसज्ज :-
हे वायरलेस (एंड्रॉयड ऑटो) Android Auto आणि अँपल कारप्ले (Apple CarPlay) ला सपोर्ट करते. या मध्ये पुन्हा डिझाईन केले डॅशबोर्ड देखील आहे. तसेच या मारुती कारकडे एकूण 6 एअरबॅग्ज ( 6 airbags) आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP) सरख्या सेफ्टी फीचर्स आहेत.
2022 मारुती बलेनो 1.2-लिटर VVT युनिट किंवा 12V माइल्ड हाइब्रिड टेक्नॉलजीसह ड्युअलजेट इंजिन ऑप्शनसह येईल. हे इंजिन 113Nm टॉर्कसह 82hp पॉवर जनरेट करते. Baleno 2022 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि AMT सह येईल. मारुतीची नवीन बलेनो सध्याच्या बलेनोपेक्षा महाग असू शकते कारण त्यात अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.
या गाड्यांशी होणार तगडा मुकाबला :-
नवीन बलेनो लाँच झाल्यावर ती Hyundai i20, Tata Altroz, Toyota Glanza आणि Honda Jazz सारख्या कारशी स्पर्धा करेल.ऑटो कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की ग्राहक 11,000 रुपयांच्या पेमेंटसह नवीन बलेनो बुक करू शकतात…
तुम्ही Nexa आउटलेट आणि Nexa वेबसाइटला भेट देऊन 11000 रुपयांमध्ये नवीन Baleno बुक करू शकता. याशिवाय, कंपनीने असेही म्हटलं आहे की, नवीन बलेनो इमर्सिव्ह ड्रायव्हिंग एक्सपीरियंससाठी हेड-अप डिस्प्ले (HUD) देखील वापर करणार आहे.