Take a fresh look at your lifestyle.

CNG Cars : फक्त 4 लाखांपासून स्टार्ट होणाऱ्या ‘या’ 5 शानदार CNG Cars ; 35kms पर्यंत मिळेल मायलेज !

0

शेतीशिवार टीम, 12 फेब्रुवारी 2022 : Best CNG Cars : भारत देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर आता तर आकाशाला भिडले आहेत.तसेच पेट्रोल आणि डिझेल कारच्या तुलनेत सीएनजी (CNG) कार चालवण्याचा खर्च खूपच कमी आहे. सीएनजी (CNG) कारचा तुमच्या खिशावर कमी परिणाम होतो.

आजकाल तुम्ही नवीन CNG कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण अशाच काही वाहनांबद्दल सांगणार आहोत,जे फार महाग नाहीत आणि मायलेजच्या बाबतीतही उत्कृष्ट आहेत.

सेलेरियो S-CNG :-

मारुती सुझुकीने जानेवारी 2022 मध्ये त्यांच्या सेलेरियो (Celerio) कारची S-CNG Version बाजारात आणली. दिल्लीत त्याची एक्स-शोरूम किंमत 6.58 लाख रुपये आहे. यामध्ये S-CNG तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. नवीन Celerio K-सिरीजमधील 1.0-लिटर इंजिनद्वारे समर्थित आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार एक किलो सीएनजीमध्ये 35.60 Km पर्यंत जाऊ शकते.

अल्टो CNG :-

मारुती सुझुकी अल्टो सीएनजी किट (Alto CNG kit) सह येते. मारुतीची अल्टो कार बरीच लोकप्रिय आहे.अल्टोची ARAI सर्टिफाइड फ्यूल इकॉनमी 31.59 Km आहे. कारमध्ये 0.8 लीटर 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे.अल्टोची सुरुवातीची किंमत सुमारे 4.58 लाख रुपये आहे.

वॅगनआर CNG :-

मारुती सुझुकी वॅगनआर कार (Maruti Suzuki WagonR car) देखील CNG किटसह येतात.तसेच फीचर्स बद्दल बोललो तर वॅगनआर सीएनजीच्या एक्सटिरियर मध्ये रुफ अँटिना आणि बॉडी कलर्ड बंपर दिले आहे.

यात ड्यूल टोन इंटिरियरसोबत फ्रंट लँम्प्स आणि तिकिट होल्डर सोबत ड्रायवर साईड सनवायजर मिळते. Wagonr CNG मायलेज 32.52 kmpl आहे. यात 1.0 लिटर आणि 1.2 लिटर इंजिन, दोन पर्याय आहेत. WagonR ची किंमत 4.93 लाख पासून सुरू होते.

ह्युंदाई सँट्रो CNG :-

Hyundai Santro च्या CNG , कारमध्ये रुफ माउंडटे अँटिना, मॅन्यूअल एसी आणि स्टियरिंग माउंटेड ऑडियो अँड ब्लूटूथ कंट्रोल दिले आहेत. तसेच स्पोर्ट्ज सीएनजी व्हेरियंटमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सोबत नेव्हिगेशन, इलेक्ट्रिकली अजस्टेबल ORVMs, इंटिग्रेटेड टर्न इंडिकेटर्स यासारखे फीचर्स दिले आहेत. Hyundai Santro या कारची किंमत 599,900 रुपयांपासून सुरू होते. ही कार CNG वर 29 Km मायलेज देऊ शकते.

ह्युंदाई ग्रँड i10 Neos CNG :-

Hyundai Grand i10 Neos CNG Version मध्ये इतर कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. मॅग्ना व्हेरियंटमध्ये ग्लॉस ब्लॅक आणि क्रोम फ्रंट ग्रिल, एलईडी डीआरएल, 14-इंच स्टील व्हील, फॉलो-मी-होम हेडलॅम्प, डे/नाईट इन रिअर व्ह्यू मिरर, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स ,ड्राइवर सीट हाइट अजस्ट, फ्रंट USB पोर्ट यांसारखी फीचर्स दिलेली आहेत.

तसेच या गाडीचे इंजिन 1.2 L आहे. एक किलो सीएनजीमध्ये ते 25 Km पर्यंत जाऊ शकते. त्याची एक्स-शोरूम किंमत 6.99 लाख रुपये आहे. ही 5 सीटर हॅचबॅक कार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.