धकाधकीच्या जीवनात हाय ब्लड प्रेशरवर नियंत्रण कसं ठेवाल ? ‘या’ 5 टिप्स नक्की करा फॉलो !

0

शेतीशिवार टीम : 11 जुलै 2022 :- जीवन इतके धकाधकीचे झाले आहे की, आपल्या स्वास्थ्याचीही हेळसांड होताना दिसते. मात्र रोगविरहीत आयुष्य जगायचे असेल तर शरीर स्वास्थ्य जपायलाच हवे . तेलकट पदार्थ खाणे हे सर्वांनाच आवडते त्यामुळे हळूहळू वाईट कोलेस्ट्रॉल (Bad cholesterol) आपल्या रक्तात जमा होऊ लागते, या एलडीएल (LDL) च्या वाढत्या प्रमाणामुळे हृदयाला रक्तपुरवठा करण्यात समस्या निर्माण होतात.

या ब्लॉकेजमुळे रक्तदाब (Blood pressure) वाढू लागतो जो नंतर हृदयविकारासारख्या गंभीर आजाराचे कारण बनतो. मात्र थोडीशी काळजी घेतली तरी घरातल्या घरात आपण हाय बीपीची तक्रार दूर करू शकता. अर्थात कोणतेही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यायला हवा….

तणाव कमी करा :-

आजकाल कामाचा ताण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे ताणतणाव वाढतो. त्यामुळे रक्तदाब वाढणे अपरिहार्य आहे. त्यामुळे छोट्या-छोट्या समस्यांबद्दल मनाला ताण देऊ नका.

शारीरिक व्यायाम करा :- 

जर तुम्ही दैनंदिन जीवनात व्यायाम करीत नसाल तर ब्लड प्रेशर सारख्या समस्या नक्कीच येण्याची शक्यता आहे. यासाठी तुम्ही घरच्या घरी जड काम करू शकता. यासाठी लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करावा, जड बादली उचलावी, दोरीने उडी मारावी, टेरेसवर चालावे, असे केल्याने कोलेस्ट्रॉल आणि बीपी नियंत्रित राहते.

मीठ कमी खा :-

मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाची चव बिघडू शकते, मात्र त्याचे अतिसेवन तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दिवसातून 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. वास्तविक, मिठामध्ये असलेल्या सोडियममुळे रक्तदाब वाढतो काही लोकांना जेवणावर अधिक मीठ हवे असते, मात्र आपला हात आवरता घेतला पाहिजे.

चहा – कॉफी कमी प्या :-

आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की जे सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात आणि संध्याकाळपर्यंत अनेक कप रिचवतात . असे करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही . कारण या पेयांमध्ये कफिनचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे उच्च रक्तदाब होतो . त्यामुळे चहा किंवा कॉफी मर्यादित प्रमाणात प्या किंवा त्यापासून पूर्ण अंतर ठेवा.

Leave A Reply

Your email address will not be published.