शेतीशिवार टीम,11 डिसेंबर 2021:- देशात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी सातत्याने वाढतच चालली आहे. यासोबतच बाजारपेठेतील इलेक्ट्रिक स्कूटरचे ऑप्शनही वाढत आहेत. अलीकडे, हैदराबादची स्टार्टअप कंपनी PureEV ने त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर PureEV EPluto 7G आणली आहे. खास गोष्ट म्हणजे या स्कूटरमध्ये तुम्हाला 120 किमी पर्यंतची रेंज मिळेल आणि तुम्ही ती EMI वर 2900 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. तर जाणून घेऊयात या स्कूटर बद्दल अधिक डिटेल्स..
40 Kmph चा वेग फक्त 5 चं सेकंदात :-
EPluto 7G ही कंपनीची सर्वात प्रीमियम स्कूटर आहे. यात 1.5KW मोटर आणि 2.5kWh लिथियम-आयन बॅटरी आहे. पूर्ण चार्ज केल्यावर ते 90 ते 120 किमीची रेंज देते. स्कूटरचा टॉप स्पीड 60KMPH आहे. 0 ते 40kmph चा वेग पकडण्यासाठी फक्त 5 सेकंद लागतात असा कंपनीचा दावा आहे. पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 ते 6 तास लागतात.
हे आहेत फीचर्स :-
या इलेक्ट्रिक स्कूटरची रचना तुम्हाला Vespa आणि Bajaj Chetak Electric सारखीच दिसेल.
यात क्रोम-फिनिश्ड मिररसह गोल हेडलॅम्प्स मिळतात.
यात 5 इंचाचा एलसीडी डिस्प्ले मिळतो.
एलईडी हेडलॅम्प (LED headlamps) अँटी थेफ्ट सिस्टमसह स्मार्ट लॉक आहे.
स्कूटरचे कर्ब वजन सुमारे 76 किलो आहे.
यात 10-इंच अलॉय व्हीलसह ब्रेकिंगसाठी डिस्क-ड्रम ब्रेक आहेत.
किंमत आणि EMI पर्याय :-
या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 83,999 रुपये आहे. परंतु, तुम्ही Rs 2,891 च्या EMI वर खरेदी करू शकता.
किंमत पाहता स्कूटरची थेट स्पर्धा ओकिनावा प्रेझ आणि अँपिअर मॅग्नस प्रो यांसारख्या इलेक्ट्रिक स्कूटरशी आहे.
ही स्कुटर लाल, काळा, निळा, राखाडी, पांढरा आणि पिवळा अशा 6 कलरमध्ये उपलब्ध आहे.