Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगर हादरलं ! 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; MIDC परिसरातील घटना…

0

शेतीशिवार टीम,11 डिसेंबर 2021 :- अहमदनगर शहरातील एमआयडीसी (MIDC) परिसरातील साईबन कृषि पर्यटन केंद्राजवळ एका 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात (MIDC Police Station) याप्रकरणी ता.10 डिसेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली असून आरोपीचा शोध सुरु आहे.

सविस्तर माहिती अशी की, 9 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास साईबनजवळच्या ओसाड माळरानावर दहा वर्षांची मुलगी शेळ्या चारत असताना त्या ठिकाणी एक अज्ञात व्यक्तीने मुलीसोबत ओळख असल्याचे दर्शवून तिला साईबन कृषि पर्यटन केंद्राजवळ एका ओढ्याकडे घेऊन गेला.

त्या ठिकाणी त्याने बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला अन् तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकीही दिली. पीडिता घरी आल्यानंतर आईला तीची प्रकृती ठीक न वाटल्याने विचारपूस केली असता मुलीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला.

नंतर आईने प्रथम मुलीला रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेली. डॉक्‍टरांनी केलेल्या तपासणीत तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले. नंतर पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात याप्रकरणी (ता.10) डिसेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास फिर्याद दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.