शेतीशिवार टीम,11 डिसेंबर 2021:- आयएएस (IAS) आणि आयपीएस (IPS) होण्याचं स्वप्न पाहण्यासाठी तरुणांना कठोर अभ्यास करावा लागतो. दरवर्षी लाखो तरुण या परीक्षेची तयारी करतात परंतु ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकणारे विद्यार्थी फार कमी आहेत. ही यूपीएससी (UPSC) परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते.
पहिले दोन टप्पे लिखित आहेत आणि तिसरा टप्पा तोंडी आहे. मुलाखतीदरम्यान असे अनेक गुंतागुतीचे प्रश्न विचारले जातात ज्यांची उत्तरे पटकन देणे सोपं नसते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत जे मुलाखतीदरम्यान विचारले गेले आहेत…
प्रश्न : सम्राट अशोकाचा उत्तराधिकारी कोण होता ?
उत्तर : बिंदुसार.
प्रश्न : महाराणा प्रताप बुलबुल कोणाला संबोधले जात होते ?
उत्तर : त्याच्या घोड्याला
प्रश्न : संसदेत कोणती 2 सभागृहे आहेत ?
उत्तर : लोकसभा आणि राज्यसभा.
प्रश्न: भारतातील सर्वात लहान राज्य कोणतं आहे ?
उत्तर : गोवा.
प्रश्न : आपल्या शरीराभोवती माश्या का घोंगतात ?
उत्तर : कार्बन डायऑक्साइडमुळे. जेव्हा मानव श्वास घेतात तेव्हा ते ऑक्सिजन श्वास घेतात आणि कार्बन डायऑक्साइड सोडतात. या वायूमुळे माश्या आकर्षित होतात. म्हणूनच ते मानवी शरीरावर घोंगतात.
प्रश्न: माशीला किती दात असतात ?
उत्तरः माशीच्या तोंडात दात नसतात, ती पातळ पेंढ्यासारखी जिभेने अन्न शोषते.
प्रश्न : जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता आहे ?
उत्तर : गोरखपूर रेल्वे स्टेशन. हा प्लॅटफॉर्म 1366 मीटर लांब आहे. सध्या जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म म्हणून या प्लॅटर्फार्मला ओळखले जाते.
प्रश्न: विमान गेल्यानंतरच त्याचा आवाज का येतो ?
उत्तर : प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त आहे.
प्रश्न : पुस्तक हे माणसाचे चांगले मित्र मानले जातात, का ?
उत्तर : पुस्तके आपल्याला मार्गदर्शन करतात तसेच आपल्या विचारांत भर टाकतात व नवीन दृष्टीकोन विकसित करतात. त्याच वेळी, पुस्तकांच्या माध्यमातून आपण अनेक दशके आणि शतकानुशतके जुने विचार, परंपरा, अनुभव आणि परिस्थिती अत्यंत कमी वेळात समजून घेऊन आपला उद्याचा काळ उत्तम घडवू शकतो. त्यामुळे पुस्तकांना मानवाचे चांगले मित्र म्हटले जाते.
प्रश्न : म्हातारपणी केस पांढरे होण्यामागचं कारण काय ?
उत्तर : वयानुसार मेलेनिनचे प्रॉडक्शन कमी होऊ लागतं. मेलेनिन तत्वामुळे (Melanin element) आपले केस काळे होतात, ते जसजसं आपलं वय वाढतं जातं तसतसं केस पांढरे होऊ लागतात.