शेतीशिवार टीम : 4 जुलै 2022 :- UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS)अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.
खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये खूप मदत करू शकतात.
प्रश्न : शंभर रुपये सुट्टे केल्यांनतर 10 ची एकही नोट नसावी, पण एकूण नोटा 10 असाव्या, कसे ?
उत्तर : 50+20+5+5+5+5+5+2+2+1 = 100
प्रश्न : दोन घरांना आग लागली आहे, एक श्रीमंतांची आणि दुसरी गरीबांची, पोलीस कोणत्या घराला आधी आग विझवणार?
उत्तर : पोलीस आग विझवत नाहीत, यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करावं लागेल.
प्रश्न : एका मुलाला पाहून स्त्री म्हणाली, आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे, दोघांचं नातं सांगा ?
उत्तर : आई आणि मुलगा
प्रश्न : कोणत्या देशात एकही रेल्वे ट्रॅक नाही ?
उत्तर : जगात असे अनेक देश आहेत जिथे रेल्वे मार्ग नाही, रेल्वेचं जाळं अजिबात नाही – भूतान, सायप्रस, पूर्व तिमोर, जिनिया, बिसाऊ, आइसलँड, कुवेत आणि लिबिया हे देश आहेत.
प्रश्न : सपाट पाय (flatfoot) असलेल्या मुलांना भारतीय सैन्यात भरती का केलं जात नाही ?
उत्तर : मेडिकल रिपोर्टनुसार, सपाट पाय असलेला मुलगा सैन्यात दैनंदिन कामे करण्यासाठी फिट बसत नाही. सपाट पाय असलेल्या मुलांमध्ये गुडघे, कंबर, पाय आणि तळव्यांना सूज येणे यांसारख्या तक्रारी असतात. सपाट पाय असलेल्या मुलांनी अति रनिंग केली तर त्यांच्या मणक्याचे नुकसान होऊ शकतं.
सैन्याची कठोर शारीरिक दिनचर्या असते ज्यामध्ये भरपूर धावणे, चढणे, उडी मारणे, कठीण प्रदेशात असमान पृष्ठभागावर धावावं लागतं. म्हणूनच सपाट पाय असलेल्या मुलांना सैन्यात घेतलं जात नाही.
प्रश्न : कोणता प्राणी एकदा झोपल्यानंतर उठत नाही ?
उत्तर : मुंगी हा असा प्राणी आहे की तो एकदा झोपला की उठत नाही.
प्रश्न : दहाव्या मजल्यावर सुरू असलेल्या मुलाखतीत उमेदवाराला सांगितलं, ‘तू खिडकीतून उडी मार, तू वाचलास तर तुला सिलेक्ट केलं जाईल?
उत्तर : उमेदवाराला हा प्रश्न समजला, आणि त्याने हुशारीने खिडकीवर चढून खोलीच्या आतील बाजूस उडी मारली आणि लगेच परीक्षा उत्तीर्ण झाला.
प्रश्न : असा कोणता शब्द आहे जो आपण पाहतो पण वाचत नाही?
उत्तर : नाही.
प्रश्न : सर्व प्राण्यांचं रक्त लाल असतं का ?
उत्तर : नाही, उत्तर अमेरिकेत आढळणाऱ्या खेकड्याचं रक्त निळं असतं. न्यू गिनी नावाच्या गिरगिटाचे रक्त हिरवं असतं.
प्रश्न : अशा गोष्टीचं नावं सांगा, ज्या गोष्टीला आगही जाळू शकत नाही, ती पाण्यातही भिजू शकत नाही, अन् मृत्यूही तिला मारू शकत नाही ?
उत्तर : उमेदवाराची तर्कशक्ती आणि बुद्ध्यांक तपासण्यासाठी असे प्रश्न विचारले जातात – याचं उत्तर सावली (परछाई) (Shadow) असं आहे.