Take a fresh look at your lifestyle.

Privatization : केंद्र सरकारने आणखी एक ‘ही’ मोठी कंपनी TATA ला 12,100 कोटीला विकली ; आजचं सोपवली जबाबदारी !

0

शेतीशिवार टीम : 4 जुलै 2022 :- भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी निलाचल इस्पात निगम लिमिटेड (NINL) च्या खाजगीकरणाची (Privatization) प्रक्रिया आज सोमवारी पूर्ण झाली. आता त्याचे नियंत्रण TSLP या टाटा समूहाच्या कंपनीकडे देण्यात आले आहे. अर्थ मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली.

Air India नंतर दुसरं यशस्वी Privatization :-

सध्याच्या सरकारच्या कार्यकाळात पूर्ण झालेलं हे दुसरे यशस्वी Privatization आहे. याआधी Air India टाटा समूहाकडेच सोपवण्यात आली होती. NINL साठी आमंत्रित केलेल्या बोलींपैकी, Tata Steel Long Products (TSLP) ला जानेवारीमध्ये विजेता घोषित करण्यात आलं. टाटा समूहाच्या पोलाद कंपनीने तोट्यात चाललेल्या NINL साठी 12,100 कोटी रुपयांची बोली लावली होती. ही बोली 5,616.97 कोटी रुपयांच्या राखीव किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होती. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड (Jindal Steel), नलवा स्टील अँड पॉवर लिमिटेड (Nalwa Steel) आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड (JSW Steelsteel) यां बलाढ्य कंपन्यांना मागे टाकून TATA कंपनीने हे यश मिळवलं आहे.

काय म्हणाले, अर्थ मंत्रालय ?

वित्त मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “NINL चा धोरणात्मक निर्गुंतवणूक करार आज 93.71% समभाग सामरिक खरेदीदार TSLP कडे हस्तांतरित करून पूर्ण झाला आहे.याशिवाय,ओडिशा सरकारच्या हा ओएमसी आणि एपिकॉल दोन युनिट्सचा संयुक्त उपक्रम आहे.

MMTC कडे 49.78% हिस्सा :-

या पोलाद कंपनीमध्ये MMTC कडे सर्वाधिक 49.78% हिस्सा होता, तर NMDC कडे 10.10%, BHEL 0.68% आणि MECON 0.68% हिस्सा होता. दुसरीकडे, ओडिशा सरकारी कंपन्यांकडे अनुक्रमे 20.47% आणि 12% हिस्सा होता. टाटा समूहाची कंपनी NINL साठी बोलीमध्ये विजयी झाल्यानंतर 10 मार्च रोजी शेअर खरेदी करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

मंत्रालयाने सांगितले की, या करारानुसार ऑपरेशनल क्रेडिटर्स, कर्मचारी आणि विक्रेत्यांच्या थकबाकीशी संबंधित अटी पूर्ण करण्यात आल्या आहेत. परंतु, कंपनीमध्ये सरकारची कोणतीही भागीदारी नसल्यामुळे, विक्रीमुळे तिजोरीत भर पडणार नसल्याचं सांगण्यात आलं.

2020 पासून बंद होता प्लांट :-

दरम्यान, BHEL ने BSEला दिलेल्या संप्रेषणात म्हटलं आहे की, त्यांनी NINL मधील 0.68% हिस्सा विकून TSLP कडे हस्तांतरित केला आहे. ओडिशातील कलिंगनार येथील NINL च्या प्लांटची वार्षिक उत्पादन क्षमता 11 लाख टन आहे. मात्र, सततच्या तोट्यामुळे हा प्लांट मार्च 2020 पासून बंद पडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.