Take a fresh look at your lifestyle.

जन -धन खातं असेल तर झिरो बॅलन्सशिवाय मिळवा 10 हजारांचा लाभ ; जाणून घ्या कसे ?

0

शेतीशिवार टीम, 23 डिसेंबर 2022 :जर तुमचंही जन धन खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. जन धन योजने – अंतर्गत खात्यात अनेक सुविधाही उपलब्ध आहेत. केंद्र सरकार प्रधानमंत्री जन धन योजना अंतर्गत शून्य शिल्लक बचत खातं उघडते. यामध्ये अपघात विमा, ओव्हरड्राफ्ट सुविधा, चेकबुकसह इतर अनेक फायदेही मिळतात.

जाणून घ्या,10 हजार रुपये कसे मिळवाल ?

जन धन योजनेंतर्गत, तुमच्या खात्यात शिल्लक नसली तरीही, 10,000 रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधा अल्प मुदतीच्या कर्जासारखी आहे. पूर्वी ही रक्कम ५ हजार रुपये होती. सरकारने ती आता 10 हजारांपर्यंत वाढवली आहे.

काय आहे नियम :-

या खात्यातील ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्षे आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे जन धन खाते किमान 6 महिने जुने असावे. नसल्यास, फक्त 2,000 रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट तुम्हाला मिळू शकतो.

जन धन खातं म्हणजे नेमकं काय ?

प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) हा सर्वात महत्वाकांक्षी आर्थिक प्रोग्रॅम आहे जो बँकिंग / बचत आणि ठेव खाती, विप्रेषण, कर्ज, विमा, पेन्शनमध्ये प्रवेश सुनिश्चित करतो. हे खातं कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा व्यवसाय प्रतिनिधी ( बँक मित्र ) आउटलेटवर उघडलं जाऊ शकतं. पीएमजेडीवाय खाती शून्य शिल्लक ठेवून उघडलं जात आहे.

खातं कसं उघडाल :-

प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जास्त खाते उघडले जाते. परंतु, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमचे जन धन खाते खाजगी बँकेत देखील उघडू शकता. तुमचे दुसरे बचत खाते असल्यास तुम्ही ते जन धन खात्यातही बदलू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक, ज्याचे वय 10 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, तो जन धन खाते उघडू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.