सातत्याने फेरबदल झालेल्या पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते राजगुरुनगर, व राज्य मार्गातून महामार्गात परावर्तित झालेल्या तळेगाव – चाकण – शिक्रापूर आणि पुणे – अहमदनगर रस्त्यावरील वाघोली ते शिरूर या तीनही महामागांच्या निविदा प्रक्रियेला अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरुवात केल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 21 डिसेंबर रोजी संसदेत केली.

21 डिसेंबर 2023 ते 7 फेब्रुवारी 2024 ही या तीनही रस्त्यांसाठी आठ फेब्रुवारीला या निविदा उघडण्यात येतील, अशी शक्यता आहे. पुणे – नाशिक महामार्गावर नाशिक फाटा ते राजगुरुनगर या 30 कि.मी. अंतरामध्ये यापूर्वी मोशी टोल नाका ते राजगुरुनगर चांडोली टोल नाका सहा लेन रस्ता मंजूर होता. नाशिक फाटा ते मोशी टोल नाका डीपीआर तयार असूनही निविदा काढली नाही.

2004 साली या रस्त्यावरती चार पदरी रस्ता व काही ठिकाणी सर्विस रोड असा पूर्ण करण्यात आला होता. मात्र, हा रस्ता अत्यंत अपुरा पडू लागला. यामुळे या ठिकाणी किमान दहा ते बारा लेनचा रस्ता रुंदीकरण करून करणे अशक्य असल्याने नागपूर वर्धा रस्त्याचे मॉडेल खाली चार लेन रस्ता मधील पुलावरती चार लेन रस्ता वाहतुकीस योग्य ठरेल अशी विनंती राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी केली, केंद्रीय मंत्र्यांनी तीन ते चार वेळा चाकण औद्योगिक परिसराला भेट दिल्यामुळे त्यांना या रस्त्याला आपण रुंद करू शकत नाही.

संपूर्ण उड्डाणपूल इलिव्हेटेड कॉरिडॉर करत उन्नत पूल केल्याशिवाय पुढील पन्नास वर्ष यावरती हा चांगला उपाय ठरेल. त्यामुळे या सर्व जुन्या आराखड्यांना रद्द करण्यात आले. यामध्ये तळेगाव – चाकण – शिक्रापूर या रस्त्यावरील 1 हजार कोटीच्या कामाची चार पदरी रस्त्याचेही निवेदन करण्यात आली. काही ठिकाणी संपूर्ण 54 कि.मी मध्ये उड्डाणपुलाचे काम करण्याचे ठरले.

या रस्त्याला सुद्धा 45 मीटर रुंदीकरणाची जमीन अधिग्रहण करण्याचे ठरल्यानंतर या प्रक्रियेला दोन वर्षे जातील त्यामुळे सरकारच्या ताब्यात असलेल्या 22 मीटर रुंदीकरणांमध्येच खाली चार लेन व पुलावती चार लेन या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. वाघोली ते शिरूर या 54 किलोमीटर मध्ये देशातील पहिला तीन मजली रस्ता करण्याचे नियोजन करण्यात आले..

असा होणार महामार्ग.. 

पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे दोन टप्प्यात अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून नाशिक फाटा ते आळंदी फाटा या 16.700 किलोमीटर अंतरामध्ये 3595 कोटीची निविदा करण्यात आली असून 544 कोटी रुपये जीएसटी व रॉयल्टी चे माध्यमातून राज्य शासनाने जबाबदारी घ्यायची आहे.

जमिनीवरती सहा लेन व दोन – चार पदरी सर्विस रोड महापालिका हद्दीमध्ये एकूण दहा लेन जमिनीवरती व पुलावरती आठ लेन या 17 किलोमीटर मध्ये दोन ठिकाणी वाहने उतरण्यासाठी सोय केली जाईल. आळंदी फाटा ते चांडोली टोल नाका या 13 किलोमीटर अंतरामध्ये जमिनीवरती चार लेन प्लस चार लेन चे दोन सर्विस रोड व पुलावरती आठ लेन असा संपूर्ण उड्डाणपूल या इलिव्हेटेड कॉरिडोर असून तळेगाव – चाकण – शिकापूर या संपूर्ण इलिव्हेटेड कॉरिडोरच्या जमिनीवरील चार लेन व पुलावरील चारलेन या 54 किलोमीटर अंतराची किंमत निविदेमध्ये तळेगाव ते चाकण व चाकण ते शिक्रापूर दोन टप्प्यांमध्ये निविदा प्रक्रिया पार पाडणार आहे.

पुणे शहराकडे जाणाऱ्या वाहतूक कोंडीचा फार मोठ्या प्रमाणावर ताण कमी होईल. आचारसंहितेपूर्वी वर्क ऑर्डर होऊन आदेश निघणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत..

दिलीप मदगे, समन्वय, राष्ट्रीय महामार्ग .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *