पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील 233 ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून, परवाना मिळण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी केले आहे.
आंबेगाव आणि बारामती तालुक्यातील प्रत्येकी 10, भोर 7, दौंड आणि इंदापूर प्रत्येकी 1, हवेली 17, जुन्नर 26, खेड 8, मावळ 36, मुळशी 28, पुरंदर 9, शिरूर 12 आणि वेल्हे तालुक्यातील 68 अशा जिल्ह्यातील एकूण 233 गावांत रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्यात येणार आहे. रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबतचा जाहिरनामा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://pune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या जाहीरनाम्यात गावांची नावे, सविस्तर अटी व शर्ती
आवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना अर्ज आदीबाबतची माहिती समाविष्ट असून, संबंधित तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेत याबाबत संपूर्ण तपशील व अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असेही होळकर यांनी सांगितले.
अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास, महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था यांनी रास्तभाव दुकानासाठी स्वतंत्र अर्जाव्दारे मागणी करावी.
स्वस्त धान्य दुकानाचे प्राथम्यक्रम खालीलप्रमाणे आहेत .
1 पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था)
2. नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट
3. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था
4. संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास
5. महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था
आवश्यक कागदपत्रे..
1. ग्रामपंचायतचा दुकान मागणी अर्ज, तेरीज पत्रक, ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेबाबत गटविकास अधिकारी यांचा दाखला.
2. पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्यसंस्था), नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास यांचे नोंदणी प्रमाणपत्र.
3. पंचायत / स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचे आर्थिक स्थितीबाबत कागदपत्र जसे बँक पासबुकची छायांकित प्रत व बँकेचे प्रमाणपत्र / बँक स्टेटमेंट.
4. व्यवसाय करावयाच्या जागेचे मालकीबाबत कागदपत्रे, जागा भाड्याची असल्यास भाडेपत्र, घर, टॅक्स पावती, 7/12, जागेचे क्षेत्रफळ, व्यवसाय ठिकाणाचे क्षेत्रफळ चौ.फुटमध्ये.
5. बँकेकडून कर्ज घेतले असल्यास कर्जाचा तपशील व परतफेडीचे प्रमाणपत्र (बँकेचे व कर्जाची नियमित परतफेड चालू असलेबाबत संबंधीत बँकेचे प्रमाणपत्र व कर्जाची परतफेड झाली असल्यास संबंधीत बँकेचे कर्ज पूर्ण फेड केल्याबाबतचे प्रमाणपत्र.
6. पंचायत / स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचे वार्षिक लेखे व हिशोब सन 2018-19 पासून आजपर्यंत तपासणी केलेल्या संस्थेचा अहवाल.
7. पंचायत / स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचे अध्यक्ष / उपाध्यक्ष / सचिव व सर्व सभासदांची नावे, पूर्ण पत्यासह.
8. पंचायत / स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचे मूळ व आजचे भागभांडवल व सध्या करीत असलेले व्यवसाय व कार्याची संपूर्ण माहिती .
9. रास्तभाव दुकान परवाना मिळण्याबाबत व व्यवसाय करण्यासाठी संमती दर्शविलेला पंचायत / स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचा ठराव.
10. पंचायत / स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास स्वस्त धान्य दुकान स्वतः एकत्रितरित्या चालवतील , कोणीही इतर व्यक्तीस अथवा संस्थेस चालविण्यास देणार नाही किंवा हस्तांतरीत करणार नाही याबाबत प्रतिज्ञापत्र.
11. भाडे तत्वावर दिल्या गेलेल्या जागेसंबंधी मूळ जागा मालकाचे विधीग्राह्य दस्तऐवज. पंचायत / स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचे नावे अन्य कोठेही शिधावाटप दुकान कार्यान्वित नसल्याचे रु .100 /- च्या स्टँपपेपरवर प्रतिज्ञापत्र. (सदरची माहिती खोटी असल्याचे भविष्यात निदर्शनास आल्यास नियमाप्रमाणे पढील कारवाई करण्यात येईल)
12. पंचायत / स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचे सदस्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबत रु .100/- च्या स्टँपपेपरवर प्रतिज्ञापत्र.
13. स्वयंसहायता गटाचे सभासद दारिद्र्य रेषेखालील असल्यास शिधापत्रिका / ग्रामसेवकांचे पत्र / नगरपालिकेकडील पत्र..