Take a fresh look at your lifestyle.

कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी Good News – पगार थेट 49,420 रुपयांनी वाढणार ! 50% महागाई भत्ताही वेगळा मिळणार, पहा डिटेल्स..

0

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढणार तर आहेचं. परंतु आणखी एका बाबतीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. आधी महागाई भत्त्याबद्दल जाणून घेऊया.

AICPI निर्देशांक 139.1 वर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ निश्चित मानली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. याचा फायदा थेट 1 कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे..

DA 50% वर पोहचणार..

केंद्रातील मोदी सरकार पुन्हा एकदा नवीन वर्ष म्हणजेच जानेवारी 2024 साठी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ करणार आहे. मात्र, मार्चमध्ये ही वाढ होणार आहे. नोव्हेंबर 2023 पर्यंत AICPI ची आकडेवारी आली आहे, जी 4 टक्क्यांच्या वाढीकडे निर्देश देत आहे. जर महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला तर तो 50 टक्क्यांपर्यंत पोहोचेल..

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दुहेरी आनंदाची बातमी !

आता दुसऱ्या चांगल्या बातमीबद्दल जाणून घेऊया. केंद्रीय कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टरचीही भेट मिळण्याची शक्यता आहे. याची अनेक दिवसांपासून मागणी होती. आता त्यात यंदा वाढ होणार असल्याची चर्चा आहे. असे झाल्यास पगारात मोठी वाढ होणार आहे. 7व्या वेतन आयोगांतर्गत फिटमेंट फॅक्टर वाढल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात थेट 8,860 रुपयांची वाढ होणार आहे.

डीए वाढल्यानंतर ही वाढ दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या फिटमेंट फॅक्टर 2.57 पट आहे. येत्या काही दिवसांत तो 3.68 पट वाढणार आहे. असे झाल्यास लेव्हल – 3 मधील मूळ वेतन 18000 रुपयांवरून 26000 रुपये होईल. कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट 8000 रुपयांची वाढ होणार आहे…

X क्लास आणि टीपीटीए (TPTA) – मूळ वेतन रु. 18,000 प्रति महिना.

मूळ वेतन : रु. 18,000
महागाई भत्ता (46%) : रु. 8,280
घरभाडे भत्ता (27%) : रु 5,400
वाहतूक भत्ता : रु. 1,350
परिवहन भत्तावर DA : 621 रुपये
एकूण पगार : रु. 33,651

फिटमेंट फॅक्टरमुळे पगार 49,420 रुपयांनी वाढणार..

लेव्हल – 3 मधील केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18,000 रुपये असल्यास, भत्ते वगळून त्याचा पगार 18,000 रुपये X 2.57 = रुपये 46,260 असेल. जर फिटमेंट फॅक्टर 3.68 पट वाढवला तर पगार 26000X3.68= रु. 95,680 पर्यंत पोहोचेल. यामध्ये कर्मचाऱ्यांना बंपर फायदे मिळणार आहेत. याचा अर्थ एकूणच कर्मचाऱ्यांना सध्याच्या पगाराच्या तुलनेत 49,420 रुपयांची वाढ मिळणार आहे. हे कॅल्क्युलेशन किमान मूळ वेतनावर आहे. जास्तीत जास्त पगार असलेल्यांना यापेक्षाही मोठे फायदे मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.