Milk Subsidy : दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान, काय आहेत अटी आणि शर्ती ? जाणून घ्या..
महाराष्ट्र सरकारने पशुपालकांना दूध विक्रीवर प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने त्यास मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना दुधावर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकारी संस्थांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे.
ही मोठी अट असून याला राज्यात विरोध होत आहे. कारण बहुतांश शेतकरी खासगी क्षेत्राला दूध विकतात. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाचा सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सरकार प्रतिलिटर 5 रुपये अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा करणार आहे. मंत्रिमंडळात मंजुरी मिळाल्यानंतर राज्यातील सहकारी दूध उत्पादक संस्थांच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. दुधात 3.2 टक्के फॅट आणि 8.3 SNF असेल तरच ही अट लागू होईल. त्यासाठी सहकारी दूध संघांना प्रतिलिटर किमान 29 रुपये दूध उत्पादकांना द्यावे लागणार आहेत.
पशुपालन हे अनेक नागरिकांचे उत्पन्नाचे साधन आहे. अनेकवेळा असे घडते की जनावरे दगावल्याने पशुपालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. हे लक्षात घेऊन भारत सरकारने पशुधन नोंदणी ॲप सुरू केलं आहे. या योजनेअंतर्गत जनावरांना विमा संरक्षण देण्यात येत आहे.
पशुसंवर्धन विभागाबाबत केंद्रस्तरावरुन अनेक नवनवीन योजना व उपक्रम राबविले जात आहेत. माणसाप्रमाणेच जनावरांचीही ओळख निर्माण व्हावी, या हेतुन नवी पद्धत आमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी भारत पशुधन ॲप ही नवीन संगणक प्रणाली सुरु करुन त्यावर शेतकऱ्यांकडील जनावरांच्या नोंदी करण्यात येणार आहेत.
तसेच भारत पशुधन ॲपवर नोंद केल्यावर दूध उत्पादकांना शासनाच्या 5 रुपये अनुदानाचा लाभ मिळेल, परंतु या ऑनलाइन नोंदीमुळे जनावरांच आजार, त्यावरील उपचार जनावरांच्या खरेदी विक्रीची माहिती, जनावरांची जात आदी माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती संकलीत करुन त्यानुसार पशुसंवर्धन विभागाने कामास सुरुवात केलेली आहे.
भविष्यात संगणक प्रणालीशिवाय पर्याय नाही. जनावरांचे संरक्षण, त्यांची निगा, या व्यवसायासाठीच्या शासनाच्या योजना, सवलती थेट दूध उत्पादकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्याकडील जनावरांच्या नोंदी या ॲपवर समाविष्ट करणे गरजेचे आहे. जनावरांचे टॅगींग करून त्यानुसार नंबर देण्यात येणार आहे.