देशातील पहिल्या CNG मोटरसायकलची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. बजाज ऑटो ही मोटरसायकल तयार करत आहे. आता नवीन बातमीनुसार, कंपनी ही मोटरसायकल यावर्षीचं जूनमध्ये लॉन्च करणार आहे.

ही बाईक 100cc ते 160cc पर्यंतच्या विविध सेगमेंटच्या गरजा पूर्ण करू शकतील अशा पद्धतीने ही बाईक सादर करण्याबाबत कंपनीचा विचार आहे..

बजाज ऑटोचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा म्हणाले की, CNG क्लिनर डिझेलपेक्षा अधिक कार्यक्षम आहे. CNG हे नेगलिजिबल पार्टिकुलर उत्सर्जनामुळे डिझेलपेक्षा स्वच्छ इंधन आहे, परंतु ते शून्य – उत्सर्जन इंधन नाही. म्हणूनच कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये लिक्विड पेट्रोलियम गॅस (LPG), कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG), इथेनॉल-ब्लेंडेड फ्यूल यांसारख्या मॉडेल्सचा समावेश करण्यावर काम करत आहे. येत्या काही वर्षांत तेही सुरू होईल..

देशातील पहिली CNG मोटारसायकल ही प्लॅटिनामध्ये असू शकते. त्याचे कोडनेम ब्रुझर E101 आहे. त्याची डेव्हलपमेंट अंतिम टप्प्यात आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, जर कंपनीच्या योजनेनुसार सर्वकाही झाले तर 6 महिने ते एक वर्षाच्या आत कंपनी CNG मोटरसायकल लाँच करेल. त्याचे काही प्रोटोटाइप तयार करण्यात आले आहेत. CNG मध्ये साधारणतः 1.2Kg ची टाकी 120Km मायलेज देते..

बजाज आपल्या पोर्टफोलिओमध्ये ‘क्लीनर इंधन’ चा वाटा वाढवण्याचा विचार करत आहे, ज्यात ईव्ही, इथेनॉल, LPG आणि CNG चा संपूर्ण स्पेक्ट्रम समाविष्ट आहे. सुरुवातीला ते वर्षाला सुमारे 1 ते 1.20 लाख CNG बाइक्सचे प्रॉडक्शन करेल. जे नंतर सुमारे 2 लाख युनिट्सपर्यंत वाढवले ​​जाईल. कंपनीने सीएनजी मोटरसायकलवर काम सुरू केले असून त्याचे प्रॉडक्शन छ. संभाजीनगर प्लांटमध्ये केले जात आहे..

Bajaj CNG Bike चे फीचर्स..

बजाज प्लॅटिना CNG पूर्ण डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह प्रदान केली जाईल. यात हायटेड हँडलबार आणि हिल- अंड टो-शिफ्टरसह कम्फर्टेबल राइडिंग एक्स्पेरियन्स देईल. ही बाईक हँड गार्ड्स, फ्रंट डिस्क, रियर ड्रम ब्रेक सेटअप, टेलिस्कोपिक फोर्क आणि मोनोशॉक सस्पेंशनसह लॉन्च केली जाणार आहे.

याशिवाय, हे अलॉय रिम डिझाइनसह येऊ शकते, जे प्लॅटिना 110 च्या सध्याच्या मॉडेलसारखे असेल. तसेच, उजव्या बाजूला अपवेस्ट एक्झॉस्ट मिळेल. ही मोटरसायकल सिंगल चॅनल ABS सारख्या सेफ्टी फीचर्ससह येऊ शकते..

बजाज CNG बाइकची किंमत..

सध्या, बजाज प्लॅटिना 110 च्या पेट्रोल मॉडेलची किंमत 70,400 रुपयांपासून सुरू होते आणि 78,821 रुपयांपर्यंत जाते. ही किंमत एक्स – शोरूमनुसार आहे. हे 2 व्हेरियंट आणि 6 कलर ऑप्शनमध्ये खरेदी केले जाऊ शकते. त्याचे 115cc इंजिन 8.60 PS ची पॉवर आणि 9.81 Nm टॉर्क जनरेट करू शकते. याचे मायलेज 70 किलोमीटर प्रति लिटर आहे..

चांगल्या इंधन कार्यक्षमतेसह, नवीन CNG बाईक सध्याच्या मॉडेलपेक्षा महाग असेल. हे जवळपास 80 हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केले जाऊ शकते, जी एक्स – शोरूम किंमत असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *