देशातील पहिली ‘वंदे साधारण ट्रेन’ रविवारी चेन्नईहून मुंबईत दाखल झाली असून या ट्रेनचा रेक वाडीबंदर येथे ठेवण्यात आला असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
रेल्वे बोर्डाकडून लवकरच या ट्रेनच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. रेल्वेतर्फेवंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर ‘वंदे साधारण ट्रेन’ सुरू केली जाणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेस ही एक वातानुकूलित ट्रेन आहे. तर वंदे साधारण ही बिगरवातानुकूलित ट्रेन असणार आहे. देशातील पाच महत्त्वाच्या मार्गावर लवकरच ही ट्रेन चालवली जाणार आहे.
ही ट्रेन बनवण्याची प्रक्रिया चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये सुरू आहे. यापैकी एक रेक रविवारी मुंबईत पाठवण्यात आली आहे. लवकरच या ट्रेनच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. दरम्यान ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी खूपच फायदेशीर ठरणार असून ती कधी , कोणत्या मार्गावर सुरू होणार आहे , याबाबत प्रवाशांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
पाच मार्गावर ट्रेन धावणार ट्रेन..
वंदे साधरण एक्स्प्रेस पाच मार्गांवर चालवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या पाच मार्गांमध्ये नवीन पाटणा – नवी दिल्ली, हावडा – नवी दिल्ली, हैदराबाद – नवी दिल्ली, मुंबई – नवी दिल्ली एर्नाकुलम – गुवाहाटी यांचा समावेश आहे.
सेकंड क्लासचे असणार डबे..
नवीन वंदे ऑर्डिनरी एक्सप्रेस ट्रेनमध्ये सर्व द्वितीय श्रेणीचे डबे असतील. त्यामुळे त्याचे भाडेही कमी असण्याची शक्यता आहे, ज्या मार्गांना रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे, त्या मार्गांवर लवकरच गाड्या चालवल्या जाण्याची शक्यता आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची नॉन-एसी व्हर्जन सध्या फक्त एसी चेअर कारमध्ये अस्तित्वात आहे. त्यामुळे त्यांचे रेंट ही खूप जास्त आहे.
वंदे मेट्रो आणि वंदे स्लीपरचीही तयारी सुरू..
वंदे भारत आणि वंदे मेट्रोच्या स्लीपर व्हर्जन वरही रेल्वे गतीच काम करत आहे. अलीकडेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारतच्या स्लीपर व्हर्जन ट्रेनचा कॉन्सेप्ट फोटो शेअर केला आहे. ते पुढील वर्षी मार्चपर्यंत येण्याची शक्यता आहे. या ट्रेनमध्ये एकूण 16 डबे असतील, त्यापैकी 11 एसी 3 टायर, 4 एसी 2 टायर आणि 1 डबा फर्स्ट एसी असेल. या ट्रेनचा सेट पुढील वर्षी मार्चपूर्वी तयार होईल, त्यानंतर पहिली ट्रेन चाचणीसाठी पाठवली जाईल. त्याचवेळी फेब्रुवारी-मार्चपर्यंत येणार्या वंदे मेट्रोबाबतही तयारी जोरात सुरू आहे.