Take a fresh look at your lifestyle.

Gold Price Hike : सोन्याचे दर सर्व रेकॉर्ड मोडणार ! तोळ्याचा भाव जाणार 65 हजारांपार, खरेदीदारांनी काय करावे ?

0

इस्रायल – पॅलेस्टाईन युद्ध, आखाती देशातील अनिश्चिततेचे वातावरण, खनिज तेलाचे वाढते दर या सर्व कारणांमुळे वित्तीय संस्था मध्यवर्ती बँकांनी सोने खरेदीचा सपाटा सुरू केला आहे. सध्याची तेजी आणखी काही महिने कायम राहन दिवाळीला सोन्याचा भाव 65 हजार रुपयांवर जाण्याचा अंदाज सराफ व्यावसायिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे येणारा लग्नसराईचा हंगाम लक्षात घेत ग्राहकांनी सध्याच्या किंमती तेजीवर स्वार होत दसऱ्याला खरेदीसाठी दुकानात गर्दी केली होती.

अनिश्चिततेच्या वातावरणात सुरक्षा म्हणून बऱ्याच जणांनी शेअर बाजार, म्युच्युअल फंडामधील आपल्या असेटचे सोन्यात रूपांतर करत आहेत. त्यामुळेही सोन्याची मागणी अचानक वाढली आहे. सध्याची तेजी लक्षत घेतली तर दिवाळीपर्यंत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 65 हजारांपर्यंत वर जाऊ शकतो, असे इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे संचालक सौरभ गाडगीळ यांनी सांगितले.

जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सचे आनंद पेडणेकर यांनीदेखील दुजोरा देताना युद्धासारख्या परिस्थितीचा सर्वच क्षेत्रावर परिणाम होतो. सोने आणखी महाग होण्याची शक्यता असून दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला. व्हीएम मुसळुनकर ज्वेलर्सचे संचालक सुहास मुसळुनकर यांनीदेखील भाव वाढतील, असे सांगितले. उम्मेदलाल त्रिलोकचंद झवेरीचे प्रमुख कुमार जैन म्हणाले , सोन्याच्या किमती चढ्या असूनही लोक सणासुदीमुळे सातत्याने खरेदी करत आहेत. सोन्याच्य किमती या आसपास राहिल्या तरी चांगली विक्री अपेक्षित आहे.

साधारणपणे दसरा – दिवाळीमध्ये 25 टक्के बुलियन आणि 75 टक्के दागिने असे सोने खरेदीचे प्रमाण असते; पण या वर्षी 30 टक्के बुलियन आणि 70 टक्के दागिने असे प्रमाण असेल सध्याच्या वातावरणामुळे बुलियन प्रमाण वाढल्याचे गाडगीळ म्हणाले. .

खरेदीदारांनी काय करावे ?

कर्ज घेऊन किंवा वस्तू विकून सोने खरेदी करू नये.

सोने हे नेहमीच दीर्घ काळातील मालमत्ता आहे, त्यामुळे तीन ते पाच वर्षांचे गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवून खरेदी करावी.

महिना 2 ते 5 हजार रुपये गुंतवून सोने खरेदी केल्यास खरेदी आणि गुंतवणूक दोन्ही होते, असा सल्ला सराफा व्यावसायिकांनी दिला आहे.

आज काय आहे सोने – चांदीचे दर..

आज सोन्या – चांदीच्या दरात चढ – उतार पाहायला मिळत आहेत. आज भारतात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,550 रुपये आहे. शेवटच्या दिवशी किंमत 56,950 होती. म्हणजे भाव वाढले आहेत. त्याच वेळी, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. काल 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,210 रुपये होता. आज भाव वाढले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.