Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ तालुक्यात मुख्याध्यापकासह 5 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण ; शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

0

शेतीशिवार टीम,18 डिसेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकासह पाच विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याने झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 23 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डमाळवाडी येथे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी दोन दिवसांपूर्वी करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अन्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांचीही टेस्ट करण्याचा निर्णय झाला. त्यामध्ये 5 विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह आढळून आले, तर 15 विद्यार्थी आणि शिक्षकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सध्या मुख्याध्यापकासह पाचही विद्यार्थी ठणठणीत असून त्यांच्यावर नियमानुसार उपचार आणि दक्षता घेणे सुरू आहे.

नवी मुंबईतील शाळेतील 16 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह :-

तसेच नवी मुंबईतील शाळेतील 16 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. इतक्या मोठ्या संख्येनं एकाच शाळेतील विद्यार्थ्यांना लागण झाल्याची माहिती समोर आल्यानं शाळेचं प्रशासनही हादरून गेलं आहे.

पुण्याच्या जुन्नर भागात Omicron ची एंट्री :-

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी व नारायणगाव येथील एकूण 7 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे उघड झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.सध्या 7 ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना नारायणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कोव्हीड सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे.

देशातील Omicron ची स्थिती :-

देशातील Omicron व्हेरियंटच्या कोरोनाबाधितांची संख्या 108 च्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे की, Omicron व्हेरियंट हा आत्तापर्यंत 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरला असून micron चे आता देशभरात 101 रुग्ण झाले आहेत. यापैकी सर्वाधिक 40 रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.